esakal | सोनू सूद रडारवर? आयकर विभागाने केला ऑफिसचा 'सर्व्हे'
sakal

बोलून बातमी शोधा

सोनू सूद रडारवर? आयकर विभागाने केला ऑफिसचा 'सर्व्हे'

सोनू सूद रडारवर? आयकर विभागाने केला ऑफिसचा 'सर्व्हे'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सोनू सूदच्या घरावर आज आयटी विभागाने 'सर्व्हे' केला आहे, अशी माहिती मिळत आहे. त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणांवर आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. सोनू सूदने अलिकडेच दिल्लीती आप सरकारच्या एका उपक्रमामध्ये ब्रँड अम्बासिडर होण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यानंतरच्या काही दिवसांनंतरच ही कारवाई झाली आहे. सोनू सूदने त्या बैठकीनंतर राजकारणात येण्याची शक्यता, विशेषत: दिल्लीचा सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप) यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास नकार दिला होता. याबाबतचं वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिलं आहे.

सोनू सूद कोरोनाकाळात केलेल्या आपल्या सामाजिक कार्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. कोरोना काळात अचानकपणे लावलेल्या लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मजूरांच्या स्थलांतरणावेळी सोनू सूदने त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. या काळात मदतीसाठी सोशल मीडियावरुन लोक सोनू सूदकडे मागणी करत होते. आणि सोनू सूद ती पूर्ण करत होता. त्यामुळेच त्याचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं.

loading image
go to top