सोनुनं डॉक्टरांना विचारले तीन प्रश्न, बोलती झाली बंद

कोरोनाच्या वेळी सोनूनं (Sonu Sood ) लोकांना मदतीचा हात दिला आहे.
actor sonu sood
actor sonu soodTeam esakal

मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. अशावेळी बॉलीवूडचे अनेक अभिनेते शासनाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. लोकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेता सोनु सूदही (Sonu Sood ) त्याच्या मदतशील स्वभावासाठी प्रसिध्द आहे. आतापर्यत त्यानं मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी म्हणून त्याची ओळख आहे. (Sonu Sood Asks Three Question to Doctors, 'Why They Are Prescribing Medicines Which Are)

कोरोनाच्या वेळी सोनूनं (Sonu Sood ) लोकांना मदतीचा हात दिला आहे. दररोज लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. तो आकडा वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. पुरेशा प्रमाणात व्हॅक्सिन नसल्यानंही लोकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. सोनूनं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मदतीचे आवाहन लोकांना केले होते. त्याच्याकडेही लाखो जणांनी मदत मागितली होती. मदतीची इच्छा असूनही त्यांनी ती करणे शक्य झाली नाही. याचे कारण म्हणजे साधनांची कमतरता.

ज्यावेळी सोनुनं लोकांना मदत करायला सुरुवात केली तेव्हा त्याला सगळीकडून प्रतिसाद मिळू लागला. त्यानं आता डॉक्टरांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहेत. सोनुनं व्टिट केले आहेत. त्यात आपण विचारलेल्या प्रश्नाविषयी त्यानं सांगितलं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे की, जर तुम्हाला माहिती आहे की, अजुन कोरोनावर कुठलेही प्रभावी इंजेक्शन उपलब्ध नाही हे माहिती असतानाही तुम्ही ते घेण्याचा लोकांना सल्ला का देता,

actor sonu sood
The Family Man 2: प्रियामणिचा जबरदस्त लूक पाहिलात?
actor sonu sood
'वडिल माझे बॉयफ्रेंड, भूतकाळ सोडला, भविष्य़ाकडे पाहते'

सोनुचा दुसरा प्रश्न आहे की, जर रुग्णालयांना त्यांच्याकडे औषध घेता येत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी औषधे कुठून आणायची सोनुच्या या प्रश्नांना त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्तरं दिली आहेत. त्याचे कौतूकही केले आहे. सोनुचा तिसरा प्रश्न आहे, आपण लोकं दुसरे कुठले औषध का नाही वापरत, जवळपास प्रत्येक नागरिकाच्या मनात सोनुनं जे प्रश्न विचारले आहेत. ते काही दिवसांपासून होते. आता त्यांना सोशल मीडियाच्या माध्य़मातून सोनूनं सगळ्यांसमोर आणले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com