esakal | अभिनेता सुबोध भावे आणि कुटुंबाला कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

subodh bhave

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याच्या घरीही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. सुबोधने स्वतः याविषयीची माहिती सोशल मिडियावरुन दिलेली आहे.

अभिनेता सुबोध भावे आणि कुटुंबाला कोरोनाची लागण

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झालेली आहे. मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याच्या घरीही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. सुबोधने स्वतः याविषयीची माहिती सोशल मिडियावरुन दिलेली आहे.

हे ही वाचा:  सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया, 'इंडस्ट्रीचे काही लोक खूप उडत होते...'  

अभिनेता सुबोध भावे याने सोशल मिडियावरुन स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुबोधने लिहिलंय, मी मंजीरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करुन घेतलेलं आहे. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. गणपती बाप्पा मोरया. असं ट्विट करुन सुबोधने कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. 

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यायचा सोडून दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. अनेक सेलिब्रिटी या कोरोनाच्या विळख्यात आत्तापर्यंत येऊन गेले आहेत. शूटींगच्या ठिकाणीही सर्वजण कोरोना होऊ नये यासाठी सुरक्षा बाळगत आहेत. मात्र तरीही अनेक हिंदी मालिकांच्या सेटवरही कोरोनाने शिरकाव केलेला आढळून आला आहे. सुबोधची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर तो आणि त्याचं कुटुंब लवकर ठिक व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.

चाहत्यांसोबतंच इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही सुबोध आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे. सुबोधने त्याच्या पोस्टमध्ये स्वतःसोबतंच पत्नी मंजीरी आणि मोठा मुलगा कान्हाला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. सुबोधला दोन मुलं आहेत. सुबोधचा लहान मुलगा मल्हार सुदैवाने कोरोनाच्या संसर्गापासून बचावला आहे.    

actor subodh bhave and family corona positive