सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया, 'इंडस्ट्रीतील काही लोक खूप उडत होते...'

krishna abhishek
krishna abhishek

मुंबई- बॉलीवूड अभिनेता आणि कृष्णा अभिषेकने नुकतीच सुशांत मृत्यु प्रकरणात त्याची प्रतिक्रिया दिली. सुशांत मृत्यु प्रकरणातुन इंडस्ट्रीच्या अनेक लोकांसाठी वेकअप कॉल असल्याचं त्याने म्हटलंय. त्याचं म्हणणं आहे की या प्रकरणामुळे मानसिक आरोग्यासोबतंच बॉलीवूडमध्ये असलेल्या काही वाईट गोष्टींवर देखील लक्ष गेलं आहे. सुशांतच्या मृत्युचं कारण सुरुवातीला नैराश्य असल्याचं म्हटलं जात होतं. आता सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे.   

कृष्णा अभिषेकने म्हटलंय, 'या घटनेने हे दाखवून दिलं आहे की मानसिक आरोग्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नाही तर काम कसं करणार? सुशांतच्या मृत्युनंतर लोक या गोष्टीवर जास्त लक्ष देऊ लागले आहेत. लोक खूपंच सतर्क झाले आहेत. ते देखील शांत झाले आहेत. पहिले लोक चूकीचं वर्तन करायचे आणि त्यांच्यामध्ये एटीट्युड दाखवण्याची समस्या होती. ते लोक विचार करायचे की केवळ तेच या जगात आहेत आता तेच लोक डाऊन टू अर्थ झाले आहेत. इंडस्ट्रीतील काही लोक खूप उडत होते आता ते शांत झाले आहेत.' 

कृष्णा म्हणाला होता की 'सोशल मिडियावरील नकारात्मकतेने देखील अनेक प्रसिद्ध कलाकारांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. एखादी व्यक्ती वेडी होईल आणि कठोर पाऊल उचलेल. सोशल मिडिया सोडणंच चांगल आहे. रणबीर कपूर कधीच सोशल मिडियावर आला नाही. जर तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नसाल तर यावर अजिबात येऊ नका. मी केवळ माझ्या कामाच्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करतो. तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत राहिलात तर लोक शिव्याच द्यायला सुरुवात करतील.'

sushant death krushna abhishek said industry ke kuchh log bahut udd rahe the  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com