esakal | सोनू सूदनंतर सुमित व्यास, मनिष मल्होत्रा यांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

sumeet vyas and manish malhotra

सोनू सूदनंतर सुमित व्यास, मनिष मल्होत्रा यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सर्वसामान्यांपासून ते बड्या बड्या मंडळींना कोरोना होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कित्येक कलाकारांना कोरोना झाला आहे. आता कोरोना काळात गोरगरीबांना मदतीचा हात देणारा तसेच सर्वसामान्यांचा मसिहा ठरलेला अभिनेता सोनू सूदला कोरोना झाला आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि टीव्ही मालिकात व चित्रपटात काम करणारा अभिनेता सुमित व्यास यांनाही कोरोना झाला आहे. ते दोघेही होम क्वारंटाईन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत.

अभिनेता सोनू सूदने मागील आठवड्यात कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता. आता कोरोना झाल्यामुळे त्याने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. ही बातमी सोनूने ट्विट करून दिली आहे. सोनूने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. घाबरण्याचे काहीच कारण नाही. आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडविण्यासाठी खूप वेळ आहे. मी तुमच्यासोबत सदैव आहे.' सध्या सोनू सूद पृथ्वीराज या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे. 

हेही वाचा : कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ

मनिष मल्होत्राने इन्स्टाग्राम पॉझिटिव्हचं चिन्ह पोस्ट करत घरातच क्वारंटाइन असल्याची माहिती दिली. सुमित व्यासनेही चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६३,७२९ नवे रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. याच काळात ३९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ६ लाख ३८ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख १६ हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.