Sunil Tawdes Daughter Marriage: अभिनेते सुनील तावडे यांची लेक अंकिता लग्नबंधनात अडकली.. थाटात पार पडला सोहळा.. | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor sunil tawde daughter ankita tawde got married grand wedding

Sunil Tawade: अभिनेते सुनील तावडे यांची लेक अंकिता लग्नबंधनात अडकली.. थाटात पार पडला सोहळा..

Sunil Tawade daughter wedding: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जाणारे सुनील तावडे यांच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची गोष्ट घडली आहे.

सुनील तावडे यांची लेख अंकीता तावडे नुकतीच विवाहबंधनात अडकली. सध्या अंकिताच्या लग्नाची बरीच चर्चा होत आहे. (actor sunil tawde daughter ankita tawde got married grand wedding)

सुनील तावडे यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. सध्या स्टार प्रवाह वरील 'पिंकीचा विंजय असो' या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहेत. सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडेही अभिनेता आहे. ज्याची काले धंदे ही वेब सिरिज प्रचंड गाजली.

तर मुलगी अंकीता तावडे (Ankita Tawade) ही देखील मनोरंजन विश्वात कार्यरत असूंन ती स्टार प्रवाह वाहिनीत निर्माती म्हणून कार्यरत आहे. (Marathi Tajya Batmya)

नुकताच अंकिताचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. विशेष म्हणजे लेकीच्या लग्नात अभिनेते सुनील तावडे ही मनसोक्त नाचले. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अंकिताच्या पतीचे नाव प्रवीण वार असे असून त्यांचा प्रेमविवाह आहे.

या सोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये संस्कृती बालगुडे, मुग्धा कर्णिक, मानसी नाईक, प्रथमेश परब आणि अनेक कलाकारांचा समावेश आहे. अत्यंत शाही असा हा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :marathi actor