Kushal Badrike: रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला.. म्हणत कुशल बद्रिकेची पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kushal badrike shared instagram post poem about sleepless night and sadness

Kushal Badrike: रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला.. म्हणत कुशल बद्रिकेची पोस्ट..

Kushal Badrike म्हणजे 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडीच्या मंचावरचा एक हिरा...गेली अनेक वर्ष या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचे निखळ मनोरंजन करणारा कुशल आपल्या अचूक क़ॉमेडी टायमिंगमुळे घराघरात प्रसिद्ध झाला आहे.

कुशल आज 'चला हवा येऊ द्या' या आपल्या शो सोबतचअधनं-मधनं सिनेमातूनही आपली अभिनयाची चणूक दाखवताना दिसतो. 'एक होता काऊ','पांडू' या सिनेमांतून मध्यवर्ती भूमिकेत चमकलेल्या कुशलनं आपण केवळ विनोदीच नाही तर वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करू शकतो हे देखील दाखवून दिले आहे.

गेली काही दिवस कुशल चांगलाच लिहिता झाला आहे. आपले विचार, मनातली सल तो लिहून सोशल मिडियावर शेयर करत असतो. काहीशा गद्य-पद्य स्वरूपातील या पोस्ट असतात. नुकतीच कुशलने एक पोस्ट लिहिली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

(kushal badrike shared instagram post poem about sleepless night and sadness)

या पोस्ट मध्ये कुशल म्हणाला आहे, ''रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला , मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू ... रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर . “वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही. अश्या वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. - सुकून'' अशा शब्दात कुशलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हल्ली कुशल 'सुकून' या नावाने लिहू लागला आहे, त्याच्या या पोस्टवर प्रतिसादही चांगला मिळतो आहे. लॉक त्याच्या लिखाणाचे कौतुक करत आहे. कुशलच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत . ‘तुम्ही खूप छान लिहिता’, ‘सर खूपच सुंदर कॅप्शन’ असे चाहत्यांनी म्हटले आहे.

पण त्याची ही पोस्ट नेमकी कुणासाठी, त्याचा अर्थ काय असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी कुशल अस्वस्थ आहे का अशीही काळजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :marathi actor