
धोनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला काम मिळत नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण, अशी प्रतिक्रिया आम्ही नाही तर अभिनेता केआरके याने दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये टिकून राहणं इतकही सोप्प काम नाही. केवळ उत्त्म अभिनय आणि मेहनत यांच्या जोरावरच बॉलिवूडच्या शर्यतीमध्ये टिकता येऊ शकते. खान आणि कपूर यांच्याशिवायही आता अनेक नवे कलाकार बी-टाऊनमध्ये आले आहेत. त्यांच्यामागोमाग नव्या आणि यंग कलाकारंची भरती होत आहे. नवीन टॅलेंटला वाव मिळतोय. काही असे कलाकार आहेत जे या शर्य़तीमध्ये मागे पडले आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव सामिल झालं आहे असं मत केआरकेने मांडलं आहे. जाणून घ्या कोण आहे तो कलाकार ?
सहा वर्षे डेट केल्यावर या कारणाने सुशांत आणि अंकिताचा 'पवित्र रिश्ता' तुटला
धोनीची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंग राजपुत याला काम मिळत नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण, अशी प्रतिक्रिया आम्ही नाही तर अभिनेता केआरके याने दिली आहे.
केआरकेने अशी टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर तो अनेकदा टीका करतच असतो. आता त्याने थेट निशाणा साधलाय तो सुशांत सिंग राजपुतवर. केआरकेने एक ट्विट करत सुशांतवर टीका केलेय़. ट्विटमध्ये त्याने लिहिलं आहे की, ''माझ्या सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांत सिंग राजपुत सध्या निराश आहे कारण, कोणताही दिग्दर्शक त्याला सिनेमा ऑफर करत नाहीए. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो भूमिगत (underground) झाला आहे आणि तो सध्या कुठे आहे याची खबर कोणालाच नाही.'' केआरकेच्या ट्विटवर सुशांतने मात्र अजुनही कोणताही रिप्लाय दिलेला नाही.
According to my sources actor #SushantSinghRajput is depressed because no film maker is offering him any film. Hence he has gone underground since a month and nobody knows about his location.
— KRK (@kamaalrkhan) January 16, 2020
सुशांतच्या पर्सनल लाइफविषयी
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत डेट करत आहे. सुशांत आणि रिया पॅरिसमध्ये एकत्र फिरायलाही गेले होते. मात्र याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. दोघांनी एकमेकांच्या अकाउंटवर पॅरिसचे फोटो अपलोड केले आहेत. सुशांत सिंगने काही मोजकेच सिनेमे आजवर केले आहेत पण, ते सर्व हिट ठरले. त्यामधील सुशांतच्या भूमिकांचे कौतुक सर्वच स्थरातून झाले.
याआधी सुशांत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्याने करीअरला सुरुवात केली ती छोट्या पडद्यावरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने. या सिरिअलमधील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अंकिता लोखंडेला सुशांत डेट करीत होता. अनेक वर्ष ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. काही कारणांनी दोघांचा ब्रेकअप झाला आणि ते वेगळे झाले. त्यानंतरही सुशांतचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिती सॅननशी जोडलं गेलं होतं.
सुशांतच्या वर्कफ्रंटची माहिती
सुशांतचा 'छिछोरे' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. लवकरच तो नेटफ्लिक्सच्या 'ड्राईव्ह' या चित्रपटातून झळकणार आहे. तर रिया 'जलेबी, 'बॅंक चोर', 'दोबारा' आणि 'हाल्फ गर्लफ्रेंड' या चित्रपटांतून दिसली होती.