मनोरंजनविश्वाला आणखी एक धक्का! सुशांतनंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या

susheel gowda
susheel gowda

मुंबई- बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी हे वर्ष हादरवून टाकणारं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. सुशांतनंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. या अभिनेत्याने देखील गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर येतंय. मात्र या आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. 

कन्नड सिनेइंडस्ट्रीमधील टीव्ही अभिनेता सुशील गौडाने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. वयाच्या ३० व्या वर्षी सुशीलने हे टोकाचं पाऊल उचललंय. सुशील कर्नाटकमधील मंड्या या ठिकाणी राहत होता. ७ जुलै रोजी त्याने आत्महत्या केल्याचं कळतंय. कन्नड सिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी सुशील मेहनत करत होता.

सुशील केवळ अभिनेताच नाही तर फिटनेस ट्रेनर देखील होता. 'सलगा' या आगामी सिनेमात तो एका पोलीस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार होता. सुशीलने 'अंतपुरा' या रोमँटिक मालिकेत देखील काम केलं होतं. सुशीलच्या आत्महत्येचं वृत्त कळताच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

अभिनेता दुनिया विजयने सोशल मिडियावर पोस्ट लिहून दुःख व्यक्त केलं आहे. त्याने लिहिलंय, 'जेव्हा मी पहिल्यांदा त्याला पाहिलं होतं तेव्हा तो मला हिरो मटेरिअल वाटला होता. सिनेमा रिलीज होण्याआधीच तो  आपल्याला लवकर सोडून गेला. आत्महत्या हे कोणत्याही समस्येवर उपाय असू शकत नाही. मला असं वाटतं की यावर्षी मरणाचा या क्रम असाच सुरु राहिल. केवळ कोरोना व्हायरसच्या कारणामुळे नाही तर लोकांच्या नोक-या देखील जात आहेत. त्यांच्यामध्ये आता विश्वास उरला नाही. यावेळी मजबुत रहावं लागणार आहे ज्यामुळे या कठीण काळातून आपण बाहेर पडू शकू.'

दिग्दर्शक अरविंद कौशिकने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'अतिशय दुःखद बातमी कळाली. सुशील गौडा जो अंतपुरा या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिकेत होता तो आता या जगात नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.'   

actor susheel gowda died by suicide in his home town mandya  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com