esakal | 'टीव्ही कलाकार म्हणून ठेवलं नाव' अभिनेता विक्रांत मेस्सीची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

vikrant massey

'टीव्ही कलाकार म्हणून ठेवलं नाव' अभिनेता विक्रांत मेस्सीची खंत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांची दाद मिळवणारा सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील (bollywood star actor) स्टार अभिनेता म्हणून विक्रांत मेस्सीचे (vikrant massey) नाव घेता येईल. तो एक वैशिष्ट्यपूर्ण अभिनेता आहे. त्यानं यापूर्वी काही वेबसीरिजमध्येही काम केले आहे. ते प्रेक्षकांना आवडले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असणाऱ्या विक्रांतचा नुकताच हसीन दिलरुबा (hassin dilruba) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात त्यानं तापसीच्या पतीची भूमिका साकारली आहे. क्राईम, थ्रिलर (crime thriller) या प्रकारातील या चित्रपटानं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. (actor vikrant massey reveals he faced subtle jabs from bollywood because from tv industry yst88)

विक्रांतनं एका मुलाखतीत आपल्या बॉलीवूडच्या प्रवासाबद्गल सांगितले आहे. आतापर्यतच्या खडतर प्रवासामध्ये मदतीपेक्षा नावचं जास्त ठेवण्यात आली. असा त्याचा अनुभव आहे. लोकं फार लवकर क्रिटीसाईज (criticise) करतात असे त्याचे म्हणणे आहे. विक्रांतचा आगामी काळात कृति खरबंदासोबत 14 फेरे (14 fere) नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये तो सध्या व्यस्त आहे. हे सर्वांना माहिती आहे की, विक्रांतनं त्याच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्या क्षेत्रातील एक धक्कादायक अनुभव त्यानं सांगितला आहे.

विक्रांतनं टीव्ही मनोरंजन क्षेत्र कसं होतं हे सांगितलं आहे. बालिका वधू नावाच्या एका मालिकेपासून त्याचे करिअर सुरु झाले. त्यानंतर त्याच्या अभिनयाची दखल मनोरंजन क्षेत्रात घेण्यात आली. टीव्ही क्षेत्र सोडून बॉलीवूडमध्ये एंट्री करणं हे त्याच्यासाठी सोपं नव्हतं. यावेळी त्या क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींकडून आपल्याला टोमणे ऐकावे लागले अशी आठवण विक्रांतनं यावेळी सांगितली. हा प्रवास काही सोपा नव्हता.

हेही वाचा: 'मेहंदी लगा के रखना'; पहा राहुल-दिशाचा मेहंदी सोहळा

हेही वाचा: अनुष्काची वामिका ते करीनाचा जे; स्टारकिड्सच्या जन्मानंतरचे पहिले फोटो

तुम्ही टीव्ही क्षेत्रातून आला आहात, हे सांगितल्यास तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तात्काळ बदलतो असे दिसून आले आहे. मी ही त्याला अपवाद नव्हतो. माझी सुरुवात टेलिव्हिजन पासून झाली होती. मला असं सांगण्यात आलं होतं की, मी बॉलीवूडमध्ये जाऊ नये, ते माझ्या योग्यतेचे काम नाही. मात्र मला जेव्हा एखादी गोष्ट जमणार नाही असे सांगितली जाते तेव्हा मी ती काहीही झालं तरी करतोच. हा माझा स्वभाव असल्याचे विक्रांत सांगतो.

loading image