esakal | 'मेहंदी लगा के रखना'; पहा राहुल-दिशाचा मेहंदी सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

rahul vaidya ,disha parmar

'मेहंदी लगा के रखना'; पहा राहुल-दिशाचा मेहंदी सोहळा

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

गायक राहुल वैद्यने (rahul vaidya) 'बिग बॉस १४' या शोमध्ये गर्लफ्रेंड दिशा परमारला (disha parmar) लग्नासाठी प्रपोज केले होते. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असून राहुल-दिशाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राहुल वैद्य नुकताच ‘खतरों के खिलाडी ११’चे शूटिंग संपवून भारतात परत आला आहे. येत्या १६ जुलै रोजी राहुल आणि दिशा लग्न करणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. (rahul vaidya disha parmar mehendi ceremony pvk99)

सोशल मीडियावर दिशा आणि राहुलच्या मेहंदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये दिशाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून राहुलने निळ्या रंगा कुर्ता परिधान केला आहे. राहुलने दिशासोबत फोटो काढताना तिच्यासाठी 'मेहंदी लगा के रखना' हे गाणं गायले. संगीत कार्यक्रमासाठी तयारी करतानाचेही व्हिडीओ पहायला मिळाले होते.

हेही वाचा: लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया

हेही वाचा: बिग बींच्या बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी; 'महानायक आपला मोठेपणा दाखवा'

'मी आणि दिशाने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला असे वाटते की, आमच्या लग्नाला आमच्या प्रियजनांनी उपस्थित रहावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. या सोहळ्यामध्ये गुरबानी शाहाबाद देखील गायले जाणार आहे.' असं राहुलने त्याच्या विवाह सोहळ्याबद्दल सांगितले होते. सोशल मीडियावर सध्या #dishul हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसून येत आहे .

loading image