युती तुटली तरी दोस्ती नाय.. विशाखा सुभेदारची समीर चौगुले साठी खास पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor vishakha subhedar shared post for sameer chaugule birthday

युती तुटली तरी दोस्ती नाय.. विशाखा सुभेदारची समीर चौगुले साठी खास पोस्ट..

sameer chaugule birthday : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार' यांची जोडी, ही जोडी मंचावर आली की हसून डोळे पाणवणार हे निश्चित असते. अनेक पात्र, नाना तर्हेचे विनोद करून यांनी आपल्याला लोटपोट केले. पण काही दिवसांपूर्वीच विशाखाने हा कार्यक्रम सोडला. पण आज तिचे समीरचे फोटो शेयर करत एक पोस्ट लिहिली आहे. कारण आज समीर चौगुले याचा वाढदिवस आहे. (actor vishakha subhedar shared post for sameer chaugule bithday) (samir chaugule birthday)

हेही वाचा: आसाम वासीयांच्या मदतीला बॉलीवूड धावलं,'या' कलाकारांनी केली लाखोंची मदत..

या पोस्ट मध्ये विशाखा म्हणते, 'सम्या... वेड्या माणसा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. ह्या गेल्या काही वर्षांत आपण एकत्र काम असताना, तुझ्याकडून खूप ऊर्जा मिळाली, प्रेसेन्स ऑफ माइंड, इन्स्टंट ह्या सारख्या अनेक गोष्टी शिकले..खूप काही share केलंय आपण... एक मंच अनेक वर्ष share केला..! तू उत्तम हाडाचा कलाकार आहेस मित्रा. तुझ्यातला लेखक दिवसेंदिवस स्फूरत चालल्ला आहे..!

(actor vishakha subhedar shared post for samir chaugule birthday)

पुढे ती म्हणते, 'आत्ता तुला मागे वळून बघायची गरज नाही.. खूप आनंदात, सुखात रहा. कारण उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचं आहे.. सगळ्यांनाच्या गळ्यातला ताईत झाला आहेस तू..! आपल्या जोडीने खूप छान छान प्रसंग अनुभवले आहेत. आपण भांडलो, रुसलो, हट्टी वागलो, हिरमूसलो, हसलो,मस्ती केली, खोड्या फाजील काढल्या, किस्से.आणि प्रेमही तितकेच.टॉम अँड जेरी सारखं... सम्या जे जे तुला हवं ते ते तू मिळवतोच.. त्यामुळे ते तुला मिळेलच.'

शेवटी ती म्हणाली, 'तेरा होगया रे.... तू जीत गया रे... मनापासून शुभेच्छा.. सम्या.. love u दोस्ता.. युती तुटली तरी दोस्ती नाय..' अशा शब्दात तिने समीरला शुभेच्छा दिल्या आहेत. ती कायमच समीर विषयी भरभरून बोलत आली आहे. आज तिने समीरचे कौतुक करत त्यांच्या नात्यातील गोडवा स्पष्ट केला आहे.

Web Title: Actor Vishakha Subhedar Shared Post For Sameer Chaugule Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top