'चलते चलते' फेम अभिनेते विशाल आनंद यांचं निधन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 5 October 2020

विशाल आनंद यांचं निधन ४ ऑक्टोबर रोजी झाल्याचं कळतंय. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.

मुंबई- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते विशाल आनंद यांच निधन झालं आहे. त्यांनी 'चलते चलते', 'सारेगामा', 'दिल से मिले दिल' आणि 'टॅक्सी ड्रायवर'सोबत अनेक सिनेमांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं. विशाल आनंद यांचं निधन ४ ऑक्टोबर रोजी झाल्याचं कळतंय. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.

हे ही वाचा: गायिका नेहा कक्करच्या लग्नाची पुन्हा चर्चा, पंजाबी गायकासोबत करणार लग्न?

विशाल आनंद यांचं खरं नाव भिष्म कोहली हे होतं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ११ सिनेमांमध्ये काम केलं. यापैकी काही सिनेमांचे ते निर्माता आणि दिग्दर्शक देखील होते.त्यांच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये 'चलते चलते' हा सिनेमा होता. या सिनेमात त्यांनी सीमी गरेवालसोबत स्क्रीन शेअर केली होती. 

actor vishal anand passed away due to long time sickness

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor vishal anand passed away due to long time sickness