esakal | मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

बोलून बातमी शोधा

jwala gutta

सोशल मीडियावर पोस्ट केली लग्नपत्रिका

मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ
sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही प्रसिद्ध अभिनेता विष्णू विशालशी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ज्वालाचं हे दुसरं लग्न आहे. येत्या २२ एप्रिल रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ज्वाला आणि विष्णूचा साखरपुडा पार पडला होता. आता विष्णूने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पोस्ट करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. या लग्नसोहळ्याला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणीची उपस्थित राहतील. गेल्या काही वर्षांपासून ज्वाला आणि विष्णू एकमेकांना डेट करत आहेत. 'जीवन हा एक प्रवास आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करा. नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे', असं लिहित विष्णूने लग्नपत्रिका पोस्ट केली. या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

ज्वाला गुट्टाने आतापर्यंत कॉमनवेल्थ, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यांसारख्या स्पर्धांमध्ये अनेक पदकं पटकावली आहेत. २०१० मध्ये तिने कॉमनवेल्थ स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं होतं. तर विष्णू विशाल हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 

हेही वाचा : शाहरुखइतकं मानधन मागितल्याने करणने करिनाशी धरला होता अबोला

ज्वालाने २००५ मध्ये बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २०११ मध्ये ज्वालाने चेतनला घटस्फोट दिला. तर २०११ मध्येच विष्णूने रजनी नटराजनशी लग्न केलं होतं. २०१८ मध्ये रजनी आणि विष्णू विभक्त झाले. त्यानंतर २०१९ पासून ज्वाला आणि विष्णूच्या अफेअर्सच्या चर्चांना सुरुवात झाली. विष्णू हा अभिनेत्यासोबतच क्रिकेटपटूसुद्धा आहे. टीएनसीएमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर त्याच्या पाहायला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला रामराम केला. २००९ मध्ये विष्णूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.