Krk on Pm Narendra Modi
Krk on Pm Narendra ModiEsakal

PM Modi in US: 'टेलीप्रॉम्प्टर वापरल्यानंतरही चुकीचं इंग्रजी बोलणं', अभिनेत्यांने उडवली मोदींची खिल्ली..

Actors KRK Criticizes Pm Narendra Modi : आपल्या बेताल वक्तव्यांमुळे बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता कमाल आर खान नेहमीच चर्चेत राहतो. तो अनेकदा एक ना एक विधान देतो ज्यामुळे नवा वाद निर्माण होतो. त्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे.

तरीही तो नेहमीच असं काहीतरी पोस्ट करतो की त्याची चर्चा होते. आता त्याने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवस अमेरिका दौऱ्यावर होते. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या राज्य दौऱ्याच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचले आहेत. या दौऱ्यावर भारत आणि युएसए यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंबंधी चर्चा झाली.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित केलं. यावेळी त्यांनी दहशतवाद, लोकशाही, एआय, रशिया-युक्रेन युद्ध आणि भारत अमेरिका संबंध अशा विविध विषयांवर भाष्य केलं.

 Krk on Pm Narendra Modi
Adipurush Gaiety Galaxy: आदिपुरुष मुळे आमचं नुकसान, त्यांना अटक करा.. गैटी गॅलॅक्सी थिएटरमालकांचा तीव्र संताप

दरम्यान या भाषणाचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात त्याचे इंग्रजी बोलतांना त्याचे काही शब्द चुकले त्यामुळे त्याच्यावर व्हिडिओमुळे टिका होत आहे. मात्र या व्हिडिओमागेच सत्य अजून समोर आलेले नाही. त्यातच आता या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेता केआरकेनेही ट्वीट करत त्याच्यावर टिका केली.

या पोस्टमध्ये केआरके लिहितो की, 'कोणत्याही देशाचा पंतप्रधान इंग्रजी बोलण्याइतपत शिक्षित नसेल तर काही हरकत नाही. मग त्याने भयानक इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न न करता स्वतःची भाषा बोलली पाहिजे. टेलीप्रॉम्प्टर वापरल्यानंतर चुकीचे इंग्रजी बोलणे आणि स्वतःची चेष्टा करुन घेण्यात उपयोग नाही.'

 Krk on Pm Narendra Modi
AP Dhillon Dating Khushi Kapoor: श्रीदेवीच्या दुसरी लेक करतेय 'या' सिंगरला डेट! चर्चांना उधाण..

आता त्याने हे ट्विट करत देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यांचे हे ट्विट करत सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर नेटकरी टिका देखील करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com