AP Dhillon Dating Khushi Kapoor: श्रीदेवीच्या दुसरी लेक करतेय 'या' सिंगरला डेट! चर्चांना उधाण..

AP Dhillon Dating Khushi Kapoor:
AP Dhillon Dating Khushi Kapoor:Esakal

AP Dhillon Dating Khushi Kapoor: बॉलिवूडमध्ये मोठ मोठ्या स्टारपेक्षा त्याच्या मुलांचीच चर्चा जास्त रंगत असते. कलाकारांची मुले नेहमी काही न करताही लाईमलाईट मध्ये असतात. मग ते तैमुर असो किंवा आर्यन खान. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्यातच आता स्टारकड्सच्या डेटिंगच्या चर्चाही चांगल्याच गाजतात.

अशातच सध्या सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि श्वेता तिवारीची लेक पलक हे देखील एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु असतांनाच बॉलिवूडमध्ये आणखी एक कपलच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

AP Dhillon Dating Khushi Kapoor:
PM Modi in US : अमेरिकेतील गायिकेने गायलं जन-गण-मन, पंतप्रधान मोदींना पाया पडून केलं अभिवादन; पाहा व्हिडिओ

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर ही बॉलीवूडमधील सर्वात हॉट आणि बोल्ड किड्सपैकी एक आहे. ती तिच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ति झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून पदार्पण करणार आहे.

दरम्यान आता बॉलिवूड कॉरीडोरमध्ये तिच्या डेटिंगच्या चर्चा सुरु आहेत. खुशी गायक एपी ढिल्लनला डेट करत असल्याच्या अफवा सोशल मिडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत.

AP Dhillon Dating Khushi Kapoor:
TMKOC Asit Modi : तिने असित मोदींना मॅसेज केला आणि.. जेनिफरच्या आरोपांवर मेकर्सचा मोठा गौप्यस्फोट

एपी ढिल्लन हा इंडो-कॅनेडियन गायक आहे ज्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तो खूप लोकप्रिय गायक आहे. त्याचे 'ब्राउन मुंडे' हे गाणे खुप फेमस झाले. त्यातच आता एपी ढिल्लन स्टार किड खुशी कपूरला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत

AP Dhillon Dating Khushi Kapoor:
Adipurush Nepal Update: दुष्काळात तेरावा महिना! नेपाळमध्ये आदिपुरुष वरील बंदी कायम, आता हिंदी सिनेमे...

या डेटिंगची अफवा तेव्हा पसरली जेव्हा एपी धिल्लनने नवीन गाणे रिलिज केले. एपी धिल्लन ने शिंदा काहलोसोबतच्या त्यांच्या नवीन अल्बम सिंगल 'ट्रू स्टोरीज' च्या ओळींमध्ये खुशी कपूरच्या नावाचा उल्लेख केला आहे.

ज्यामुळे सोशल मिडियावर एकच खळबळ उडली आहे. या गाण्यात तो गातो की, 'जदों हस्से तन लागे तू खुशी कपूर'. आता यामुळेच सोशल मिडियावर त्याच्या डेटिंगच्या अफवांना वारा लागला. हे दोघे आधी पासूनच डेट करत आहेत का प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.

खुशी कपूर एपीच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या आता व्हायरल झाल्या आहेत. मात्र त्या दोघांकडून विषयी काहीही सांगण्यात आलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com