आयफातील रेखा यांच्या नृत्याने सिनेसृष्टीही घायाळ...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

आपल्या चिरतरुण सौंदर्याने सगळ्यांच्या नजरा रोखणाऱ्या रेखाने 19 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर केले.

आपल्या सौंदर्याने 80-90 च्या दशकात वेड लावणाऱ्या अभिनेत्री रेखा आज वयाच्या 63 व्या वर्षीही घायाळ करत आहे. रेखा या जेष्ठ अभिनेत्रींच्या यादीत जरी सामिल झाल्या असल्या तरी त्यांचा स्टारडम कमी झालेला नाही. खासकरुन रेखा यांचा नृत्याविष्कार चाहत्यांना त्यांच्या प्रेमात पाडायचा. सध्या सिनेमातून दूर असणाऱ्या रेखा यांची हीच जादू पुन्हा एकदा एका अवॉर्ड सोहळ्यानिमित्त दिसून आली आहे. 
 

आपल्या चिरतरुण सौंदर्याने सगळ्यांच्या नजरा रोखणाऱ्या रेखाने 19 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर केले. यापुर्वी रेखा यांनी आयफाच्या स्टेजवर आपली कला सादर केली आहे. पण ती 20 वर्षापूर्वी. 'सलाम-ए-इश्क...' 'प्यार किया तो डरना क्या', 'बस एक बार मे हा कहा' या त्यांच्या सदाबहार गाण्यांवर त्यांनी ठेका धरला. रेखा यांनी इतक्या वर्षानंतर सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. 
 

 

अभिनेत्री श्रध्दा कपूर हीने रेखा यांच्या सादरीकरणानंतर त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत हे आयुष्यातील सगळ्यात छान सादरीकरण असल्याचे म्हटले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actrees Rekha performed at IIFA after twenty years