Alia Bhatt: मम्मी इज बॅक.. आलियाने भन्नाट योगा व्हिडिओ शेअर करत मातांना दिला मोलाचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt

Alia Bhatt: मम्मी इज बॅक.. आलियाने भन्नाट योगा व्हिडिओ शेअर करत मातांना दिला मोलाचा सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने एका सूंदर परीला जन्म दिला. रणवीर आणि आलियानं या मुलीचं नाव राहा ठेवलं. मात्र प्रसूती दरम्यान तिचं वजन वाढलं आहे. सहसा अभिनेत्रींना आपल्या फिटनेसची खूप पर्वा असते. त्या स्लिम राहण्यासाठी खूप मेहनत घेतात. जीममध्ये तासंतास घाम गाळतात.आता आलियालाही तिच्या वाढत्या वजनाची चिंता आहे.

ती मागे म्हटलंही होती की जेव्हा तिचं वजन वाढायला लागलं तेव्हा ती तिच्या करीअर बाबतही चिंतेत होती. मात्र आता मुलीच्या जन्मानंतर आलियाला पुन्हा तिच्या कामावर परत यायचं आहे. त्यामूळे तिला फिट राहणंही तितकच गरजेचं आहे. यासाठी तिला पुन्हा तिची बॉडी शेपमध्ये आणायची आहे.

आलिया यासाठी आता तयारीला लागली आहे. मागील काही दिवसांपासून तिला पापाराझींनी योगा सेशनला जातांना स्पॉटही केलं होतं. आता आलियाने तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती एरियल योगा करतांना दिसत आहे.

या व्हिडिओसोबत आलियाने एक लांबलचक नोटही लिहिली आहे. यात तिने लिहिलेय, 'डिलीव्हरीच्या दीड महिन्यानंतर, हळूहळू माझ्या गाभ्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहे... आज मी माझ्या ट्रेनर अंशुकाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे हा एरियल योगा करू शकले आहे. माझ्या सर्व मम्मांसाठी, प्रसूतीनंतर तुमच्या शरीराचं ऐकणं हे महत्त्वाचं आहे. तुमची बॉडी किंवा तुमचं पोटं तुम्हाला जे करायला सांगत नाही असं काहीही करू नका'

हेही वाचा: Bigg Boss 16: 'बिग बॉसने चिंटींग केली' अंकितला ठरवून शो बाहेर..सोशल मिडीयावर नेटकऱ्यांचा संताप

पुढे ती म्हणते, वर्कआउटच्या पहिल्या दोन आठवड्यात, मी फक्त श्वास घेतला... चालले... माझी स्थिरता आणि संतुलन परत मिळवलं. त्यासाठी अजूनही प्रयत्न करत आहे. तुमचा वेळ घ्या आपल्या शरीराने जे केले आहे त्याचं कौतुक करा. या वर्षात माझ्या शरीरानं जे काही केले त्यानंतर, मी पुन्हा कधीही स्वतःवर कठोर न होण्याचा संकल्प केला आहे. एका बाळाला जन्म देणं हा एकाप्रकारे चमत्कार आहे. तुमच्या शरीराला प्रेम आणि पाठिंबा देणं हे गरजेचं आहे.' अशा प्रकारे आलियानं तिच्या सर्व मम्मी फॉलोवर्सला एक मोलाचा सल्ला तिच्या या पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

हेही वाचा: Pathaan OTT Release: 'पठाण' घाबरला... 'या'OTT वर होणार प्रदर्शित!

सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर अंशुकानेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर आलिया भट्ट योगा सरावाचा व्हिडिओ शेअर केला आला आहे. व्हिडिओमध्ये आलिया भट्ट अगदी सहजतेने एरियल योगा करताना दिसत आहे. अंशुका योगाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहेत आणि सर्वत्र तिचं यासाठी कौतुकही होतं आहे.