Pathaan OTT Release: 'पठाण' घाबरला... 'या'OTT वर होणार प्रदर्शित!

Pathaan OTT Release
Pathaan OTT Releaseesakal

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटावर चांगलेच वाद होतांना दिसतं आहेत.

या चित्रपटाचे आत्ता पर्यंत दोन गाणे रिलिज झाले आहेत आणि या दोन्ही गाण्यावरुन रोजच वाद होत होतांना दिसतायं. मग ते बेशरम रंग गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी असो किंवा 'झूमे जो पठाण' चित्रपटाची धून चोरीचा असल्याचा आरोप...

दरम्यान, रिलीजपूर्वीच 'पठाण'चे ओटीटी हक्क करोडोंमध्ये विकले गेले असल्याची बातमी समोर आली आहे.

Pathaan OTT Release
Jhoome Jo Pathaan: चोरटा पठाण! कार्टून फिल्मचं गाणं शाहरुखनं चोरलं...

सध्या 'पठाण' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत निर्मात्यांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल, असं बोललं जात आहे.

चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग अधिकारांबद्दल करण्यात आलेल्या दाव्यानूसार प्रसिद्ध जागतिक OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर 'पठाण' रिलीज करण्यात येणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने २00 कोटी रुपयांमध्ये डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

'पठाण' चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पठाण हा चित्रपट हिंदीशिवाय तेलुगू आणि तामिळमध्येही प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत, या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. 'पठाण' हा चित्रपट तब्बल 250 कोटींच्या बजेटमध्ये बनला असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता या वादातून 'पठाण'ला फायदा होणार की नाही हे पाहावं लागेल.

Pathaan OTT Release
Pathaan Besharam Rang: वाद झाला पण वाया नही गेला..रेकॉर्डच केला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com