esakal | 'माऊली माऊली'! विठ्ठलाच्या भक्तीत अमृता झाली दंग; पहा व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

amruta khanvilakr

'माऊली माऊली'! विठ्ठलाच्या भक्तीत अमृता झाली दंग; पहा व्हिडीओ

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilakr) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अमृता तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच आषाढी एकादशीनिमित्त 'माऊली माऊली' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृतासोबत आशिष पाटील (Aashish Patil)देखील दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातील आशिष आणि अमृता दोघे विठोबाचे दर्शन घेतात. त्यानंतर ते परफॉर्मन्सला सुरूवात करतात. अमृताच्या या खास व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. प्रसाद ओक, स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, सोनाली खरे, अनिता राज या कलाकारांनी व्हिडीओला कमेंट करून अमृताच्या डान्सला पसंती दिली आहे. (actress amruta khanvilakr share special dance video of ashadhi ekadashi)

अमृता आणि आशिषने मिळून ‘अमृत कला’ ही डान्स सिरीज सुरु केली आहे. या सिरीजमध्ये दोघांच्या वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्सचा समावेश असणार आहे. ‘अमृत कला' या सिरीजमधील ताल, नटरंग उभा, दिलबरो या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ अमृताने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या या सिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळात आहे.

हेही वाचा: राजपाल यादवला होती जेठालालच्या भूमिकेची ऑफर, पण..

वेल डन बेबी, चोरीचा मामला, झकास या मराठी चित्रपटांमधील अमृताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. नटरंग चित्रपटातील 'वाजले की बारा' या अमृताच्या लावणीने तिची मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण झाली. नच बलिये, झलक दिखलाजा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अमृताने भाग घेतला होता.

हेही वाचा: 'माऊली', 'लय भारी' नंतर रितेशचा नवा मराठी चित्रपट

loading image