esakal | राजपाल यादवला होती जेठालालच्या भूमिकेची ऑफर, पण..
sakal

बोलून बातमी शोधा

rajpal yadav

राजपाल यादवला होती जेठालालच्या भूमिकेची ऑफर, पण..

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) मधील जेठालालच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका 13 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेता दिलीप जोशी हे गेली कित्येक वर्ष या मालिकेतील जेठालाल ही भूमिका साकारत आहेत. बॉलिवूडमधील अभिनेता राजपाल यादवने (rajpal yadav) नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जेठालाल या भूमिकेला दिलेल्या नकारामागील कारण सांगितले आहे.(rajpal yadav talk about jethalal role in taarak mehta ka ooltah chashmah)

सिद्धार्थ कन्ननने जेव्हा राजपाल यांना मुलाखतीमध्ये विचारले की, 'जेठालाल या भूमिकेची ऑफर नाकारल्यावर तुम्हाला नंतर पश्चाताप झाला का?' या प्रश्नाचे उत्तर देताना राजपाल म्हणाले, 'अजिबात नाही, जेठालाल ही भूमिका हे एक चांगले कलाकार साकारत आहेत. आम्ही मनोरंजन क्षेत्रात काम करतो त्यामुळे मी कोणत्या कलाकाराच्या भूमिकेत स्वत;ला फिट करू इच्छित नाही. त्यामुळे मला असे वाटते की माझ्यासाठी जी भूमिका असेल तिच साकारण्याची संधी मला मिळायला हवी. दुसऱ्या कलाकाराने साकारलेल्या भूमिका करण्याची संधी मला मिळू नये.'

हेही वाचा: चुनरी चुनरी गाण्यावरचा भन्नाट 'बेले डान्स' पाहिलायं?; एकदा पाहाच!

राजपाल यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. चूप चुप के, मुझसे शादी करोगी, वक्ते: रेस अगेन्स्ट टाइम, मैने प्यार क्यूं कीया आणि भूल भुलैया या चित्रपटांमध्ये राजपाल यांनी काम केले आहे. लवकरच राजपाल हे 'हंगामा-2' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात परेश रावल आणि शिल्पा शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा: नवरा असावा तर असा, प्रियंकाला निकनं दिलं खास 'बर्थडे गिफ्ट'

loading image