
'चंद्रमुखी'च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजापूरात.. पाहा खास व्हिडीओ..
Amruta khanvilkar : बहुचर्चित चंद्रमुखी सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं. या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १ कोटींहून अधिकची कमाई केली. मराठी चित्रपट सृष्टीतील भव्य दिव्य प्रमोशन झालेला सिनेमा अशी याची ओळख बनली. चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे होऊनही चित्रपटाची किमया कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा चित्रपट अधिकच गाजतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्राच्या म्हणजे प्रमुख भूमिकेत होती. टायटल रोल मिळालेला हा अमृताचा (amruta khanvilkar) पहिला सिनेमा होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली. या यशाचे सार्थक झाल्यांनतर अमृता परमेश्वराच्या चरणी लिन झाली आहे. त्यासाठी एक खास व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.
(actress amruta khanvilkar visit tuljapur and akkalkot darshan after chandramukhi success)
चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले. हा देवदर्शनाचा व्हिडीओ तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने भावूक कॅप्शनही दिले आहे.
“लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. चंद्रमुखी release झाला.. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं.. आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही”, असे तिने कॅप्शन तिने दिले आहे.
लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रसाद ओक याने दिग्दर्शित केला आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहेत. या चित्रपटात दौलत या मुख्य पात्राची भूमिका आदिनाथ कोठारे यांनी साकारली आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर आहे. या चित्रपटातील लावण्यांनी सर्वांचीच मने जिंकली आहे कारण अजय -अतुल यांचे दमदार संगीत या चित्रपटाला मिळाले आहे.
Web Title: Actress Amruta Khanvilkar Visit Tuljapur And Akkalkot Darshan After Chandramukhi Success
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..