Amruta Subhash:आलिया नंतर आता अमृता सुभाषच्या प्रेग्नंसीची चर्चा! ४३व्या वर्षी होणार आई? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress amruta subhash pregnant? she shared pregnancy test photo

Amruta Subhash:आलिया नंतर आता अमृता सुभाषच्या प्रेग्नंसीची चर्चा! ४३व्या वर्षी होणार आई?

amruta subhash pregnancy: आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. (Amruta Subhash) अमृताने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अमृता सध्या 'पुनश्च हनिमून' या नाटकामुळे चर्चेत आहे. तसेच तिच्या 'सास बहू आचार' लाही प्रचंड यश मिळाले. अमृता कायम विविध विषयांवर व्यक्त होत असते. आज मात्र तिच्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. जिथे तिथे तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा होत आहे.

(actress amruta subhash pregnant? she shared pregnancy test photo)

हेही वाचा: Madhurani Prabhulkar: फसवणूक प्रकरणी अखेर आई बोललीच.. मधुराणीची पोस्ट चर्चेत..

कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे प्रचंड कुतूहल समनाय प्रेक्षकांना असते. त्यामुळे तर आपल्या आवडत्या कलाकारांच्या पोस्टकडे सतत लक्ष ठेवत असतात. कला अशीच एक पोस्ट अभिनेत्री अमृता सुभाषने शेयर केली आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. ती पोस्ट होती, अमृता प्रेग्नंट असल्याची.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: हर मर्द को दर्द होता है! म्हणत अक्षय केळकर ढसाढसा रडला..

अमृताने काल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिची प्रेग्नेंसी टेस्ट सकारात्मक आली असल्याचे दिसले. 'द वंडर बिगिन्स ..' म्हणत तिने पोस्ट केली होती. त्यामुळे अमृता गरोदर आहे अशी वार्ता बघता बघता पसरली. अमृताच्या लग्नाला १९ वर्षे झाली त्यामुळे इतक्या वर्षांनी गोड बातमी आल्याने सगळेच आनंदी झाले. ४३ व्या वर्षी ती आई होणार असल्याने सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या.

पण काहीच वेळात यात कोणतेही तथ्य नसल्याचे अमृतानेच एका पोस्ट द्वारे स्पष्ट केले. अमृता गरोदर नसून ती साकारत असलेली 'जया' गरोदर आहे, तिच्या आगामी 'वंडर वुमन' या प्रोजेक्ट मध्ये ती जया ही पात्र साकारत आहे. माझ्यावर जसा शुभेच्छांचा वर्षाव केला तसाच जयावरही करा असे अमृताने म्हंटले आहे. त्यामुळे ही सगळी धडपड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :amruta subhash