esakal | अभिनेत्री अमृता सुभाष, राधिका आपटेचा अनुराग कश्यपला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

amruta radhika on anurag

अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले.  काहींनी अनुरागला पाठिंबा दिला तर काहींना त्याला सुनावले. अभिनेत्री अमृता सुभाषने सोशल मीडियावर पोस्ट करत अनुरागला पाठिंबा दिला आहे. अमृताबरोबरच अभिनेत्री राधिका आपटे हिने देखील अनुरागसोबत काम करताना आपल्याला नेहमीच सुरक्षित वाटल्याची भावना व्यक्त केली आहे.

अभिनेत्री अमृता सुभाष, राधिका आपटेचा अनुराग कश्यपला पाठिंबा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- मराठी अभिननेत्री अमृता सुभाष हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुरागसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत म्हटलंय,  'मला आतापर्यंत भेटलेल्या प्रामाणिक, प्रेमळ आणि खऱ्या व्यक्तींपैकी एक अनुराग असल्याचे म्हटलं आहे. त्याने सेटवर नेहमी माझा आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर केला आहे मी हे शब्दात कधीच बोलले नाही कारण आपल्या नात्यात त्याची गरज नव्हती. पण आज मी तू मला दिलेल्या आदराबद्दल धन्यवाद म्हणेन' असं अमृताने म्हटलं आहे.

हे ही वाचा:  करिना कपूर बर्थडे: सैफला दोनवेळा दिला होता नकार, सैफ-करिनाच्या लग्नावर अमृता सिंहची कशी होती रिएक्शन?  

अमृतापूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनुरागला पाठिंबा दिला होता. 'माझ्या मित्रा, मला माहित असलेल्यांपैकी तू सर्वांत मोठा स्त्रीवादी आहेस. सेटवर लवकरच भेटू. तू निर्माण करत असलेल्या विश्वात स्त्रिया किती सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे त्यातून (चित्रपटातून) स्पष्ट होणार आहे.' असं तापसीने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे असे ट्विट पायलने केले होते. त्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी अनुरागला पाठिंबा दिला तर काहींना त्याला सुनावले. अभिनेत्री अमृता सुभाषने सोशल मीडियावर पोस्ट करत अनुरागला पाठिंबा दिला आहे.

अमृताबरोबरच अभिनेत्री राधिका आपटे हिने देखील अनुरागसोबत काम करताना आपल्याला नेहमीच सुरक्षित वाटल्याची भावना व्यक्त केली आहे. 'अनुराग माझा जवळचा मित्र असुन त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. याशिवाय इतरांप्रमाणे आदराची व प्रेमाची वागणुक दिली' असल्याचं तिने म्हटलं आहे.

पायलने केलेले आरोप अनुरागने धुडकावुन लावले आहेत. 'मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बस इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत' असं ट्विट अनुरागने केलं आहं.

तर दुसरीकडे 'अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा' असं ट्विट पायलने केल्याने नवा वाद समोर आला आहे.

संपादन- दिपाली राणे-म्हात्रे

actress amruta subhash radhika aapte came in support with anurag kashyap