Chakda Express: अनुष्काची गोलंदाजी पाहून झुलन गोस्वामी 'क्लीन बोल्ड' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Anushka Sharma appreciated by Jhullan Goswami for her bawling

Chakda Express: अनुष्काची गोलंदाजी पाहून झुलन गोस्वामी 'क्लीन बोल्ड'

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तीच्या येणाऱ्या चित्रपटासाठी सगळीकडे चर्चेत आहे.ती तीच्या येणाऱ्या चित्रपटाच्या तयारीत सध्या व्यस्त दिसतेय.चकदा एक्सप्रेस या चित्रपटातून अनुष्का एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांपुढे येणार असल्याची सर्वत्र चर्चा चालते आहे.अलीकडेच अनुष्काचा एक विडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय.

अनुष्का शर्माने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला हा विडिओ शेअर केलाय.(Anushka Sharma)ज्यामधे ती बॉलींग करताना दिसून येते.बऱ्याच दिवसापासून ज्याचा मी सराव करतेय त्याचेच हे काही सिन्स असे कॅप्शन देत तीने हा विडिओ पोस्ट केलाय.तापत्या उन्हाळ्याच्या गर्मीत अनुष्का मैदानात सराव करताना बघून चाहतेही हैराण झाले आहेत.अनुष्काने छोटे छोटे सिन्स जोडत हा विडिओ बनवल्याचे दिसते आहे.

तीच्या या विडिओतील जोरदार प्रॅक्टिस बघून जगप्रसिद्ध महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी हीने इन्स्टाग्रामवर कमेंट करत अनुष्काचे कौतुक केले आहे.याआधीचेही अनुष्काचे क्रिकेट संबंधिचे काही विडिओज सोशल मीडियावर चर्चेत राहिले आहेत.चकदा एक्सप्रेस हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या बायोपिकवर आधारित असणार आहे.ज्यामधे ती या महिलेला अनेक संकंटाना तोंड द्यावे लागले.अथक प्रयत्नांनी झूलन यशाचे शिखर गाठण्यास कशी यशस्वी होते ते या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे कळते आहे.अनुष्का चकदाएक्सप्रेस साठी झूलनसारखी शरीरयष्टी बनवण्याचा प्रयत्न करतेय.या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.२०१८ नंतर अनुष्का या चित्रपटात दिसणार आहे.या काही वर्षाच्या ब्रेक मधे तीने काही वेब सिरीज शूट केल्याचे कळते आहे.

Web Title: Actress Anushka Sharma Practe Bawling For Movie Chakda Expressjhulan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top