HBD Anushka Sharma: टॅलेंट बघून करण जोहरनेही मान्य केली होती चूकी,एके काळी म्हणाला होता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Anushka Sharma was rejected by karan Johar First time

HBD Anushka Sharma: टॅलेंट बघून करण जोहरनेही मान्य केली होती चूक,एके काळी म्हणाला होता..

अयोध्येत जन्मलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माला आज सगळेच ओळखतात.तीच्या अनेक बीग बजेट चित्रपटातून तीने कमी वेळात चित्रपट क्षेत्रात चांगले नाव कमावले.मॉडेलींगपासून या अभिनेत्रीने तीच्या करियरची सुरूवात केली होती.एका वर्षात या अभिनेत्रीने चित्रपट क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे.पण मात्र या अभिनेत्रीच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी मात्र करण जोहरने जे वक्तव्य केले होते,ते धक्कादायक होते.अनुष्काचा आज ३३ वर्ष पूर्ण करत चौतीसीत पदार्पण करतेय.तीच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊया अनुष्काच्या करियरची एक खास गोष्ट.

अनुष्काचा पहिला चित्रपट होता 'रब ने बना दी जोडी',या चित्रपटासाठी जेव्हा आदित्य चोप्राने अनुष्काची निवड केली होती,तेव्हा मात्र करण नाखूश होता.आदित्यला त्यावेळी 'तू वेडा आहेस का?या मुलीला घेऊ नकोस', असा सल्ला करणने आदित्यला दिला होता.अनुष्काला या एका चित्रपटासाठी अपात्र ठरवत चित्रपटात न घेण्याचा सल्ला जरी त्यावेळी करणने आदित्यला दिला असला तरी नंतर मात्र करणने त्याच्या या सल्ल्याबाबत माफी मागीतली होती.करणच्या सल्ल्यानंतरही आदित्यचा अनुष्काला चित्रपटात ठेवण्याचा निर्णय ठाम होता.या गोष्टीचा खुलासा करण जोहरणं स्वत: एका मुलाखतीत केला होता.

करण जोहर म्हणाला, 'मी आदित्यला अनुष्का शर्माला चित्रपटात कास्ट करू नये यासाठी खूप प्रयत्न केले. आदित्यने मला अनुष्काचे फोटो दाखवले ज्यावर मी त्याला म्हणालो की तू वेडाआहेस का? 'रब ने बना दी जोडी'च्या शूटिंगदरम्यान, अनुष्का वधूच्या गेटअपमध्ये बसली होती आणि हा तिचा पहिला शॉट होता, जो पाहून माझ्या आईने मला सांगितले की, ती कुठेतरी हरवल्यासारखी दिसत आहे.'या यशस्वी चित्रपटानंतर अनुष्काचे अनेक चित्रपट आलेत.आज ती बॉलीबूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.अनुष्का शर्मा आज प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर ती वेब सिरीज निर्माती सुद्धा आहे.तीने मधल्या काळात काही वेब सिरीज वर काम केले आहे.