
apurva nemlekar : शेवंता हे नाव घराघरात पोहोचवणारी आणि शेवंता म्हणून ओळख मिळालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या बरीच चर्चेत आहे. अपूर्वाने या आधी नाटक, मालिका, सिनेमा यात बरेच काम केले आहे. परंतु 'रात्रीस खेळ चाले' या झी मराठीवरील मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. अपूर्वा ( apurva nemlekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. मध्यंतरी तिने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला तिने रामराम केला. सध्या ती नव्या कामाच्या गडबडीत आहे. पण आज तीची चर्चा आहे कारण तिने कृष्ण जन्माष्टमीच्या एकदम हटके शुभेच्छा आपल्या चाहत्यांना दिल्या आहे. अपूर्वाने स्वतः कृष्ण अवतार धारण करून काही फोटो शेयर केले आहेत. (actress apurva nemlekar shared photos about she gate up like shri krishna god on Krishna Janmashtami)
या फोटोमध्ये अपूर्वा ही साक्षात श्रीकृष्णाप्रमाणे दिसत आहे. ही अपूर्वाच आहेका याचाही आपल्याला विसर पडतो. हातात वेणु घेऊन जणू कृष्ण समोर उभा आहे अशा रूपात अपूर्वा चाहत्यांसमोर आली आहे. आज कृष्ण जन्माष्टमी, त्यानिमित्ताने अपूर्वाने हे फोटो शेयर केले आहेत. आज सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे, उद्याच्या गोपळकाल्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अपूर्वाचे फोटो पाहून चाहते भारावून गेले आहेत. अपूर्वाने यासोबत एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.
अपूर्वा म्हणते, 'भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचे शत्रू त्याला मारण्यासाठी टपून बसलेले होते. परंतु श्रीकृष्णाने मात्र सर्व संकटांवर मात करून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री जन्म घेतला. हाच दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो.'
'जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो. यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.'
''ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच त्या केशवाचे चरणी प्रार्थना आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशांनी तुमचे जीवन उजळून निघावे... श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा |अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी बल्लभम।'' अशी पोस्ट अपूर्वाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.