Bigg Boss 16:अर्चनाला झटके आले की काय? स्पर्धक घाबरले...व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss 16
Bigg Boss 16Esakal

बिग बॉस 16 शोच्या फिनालेला काही दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत घरातून एक एक करून स्पर्धक बाहेर पडत आहेत, तर सध्या बीबी हाऊसमध्ये उपस्थित स्पर्धक शोमधील आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Bigg Boss 16
Pathaan Movie: 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखची हवा! मन्नत बाहेर चाहत्यांची जत्रा

या सगळ्यामध्ये बिग बॉसच्या घराशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर प्रेक्षक घाबरले आहेत. घरातील सदस्य अर्चना गौतमची एक क्लिप सध्या चर्चेचा विषय आहे. काही सेकंदांच्या क्लिपमध्ये असे काही दिसले की, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Bigg Boss 16
Bigg Boss 16: 'तूझ्यासोबत नाही बोलायचं', शिवचं निमृतसोबत खटकलं...

व्हिडिओच्या सुरुवातीला अर्चना गौतम किचनमध्ये काम करताना दिसत आहे. मग अचानक असं काही होतं की अर्चना जोरजोरात ओरडू लागली. कलर्स टीव्हीने आपल्या इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्चना गौतम ओरडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गौतम किचनमध्ये काहीतरी करतांना दिसत आहे.अचानक स्वयंपाकघरात काहीतरी घडते, ते पाहून अर्चना जोरजोरात किंचाळू लागते आणि ओरडत रुमकडे धावते.

अर्चनाची अवस्था पाहिल्यानंतर इतर सदस्याना समजत नाही की तिला अचानक काय झालयं. प्रियांका आणि टीना दत्ता अर्चनाला हाताळण्याचा प्रयत्न करतात पण अर्चना काहीही न बोलता जोरात ओरडते.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Bigg Boss 16
Bigg Boss 16: वेळेपूर्वीच उघड झाली टॉप 3 स्पर्धकांची नावं; स्पर्धकानेच केला खुलासा..

या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'अरे देवा, मला खूप भीती वाटते. आशा आहे की अर्चना बरी आहे' आणि दुसर्‍याने लिहिले, 'तिला झटके येत आहेत का?' तिसऱ्याने लिहिले, 'घरातील वातावरणामुळे त्याच्या मनावर परिणाम झाला आहे.' याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, 'मला चक्कर येत आहे.'बिग बॉसच्या घरात भूत आहे की काय "

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com