esakal | 'मुस्लिम म्हणून गणपतीची पूजा करायची नाही का?'
sakal

बोलून बातमी शोधा

'मुस्लिम म्हणून गणपतीची पूजा करायची नाही का?'

'मुस्लिम म्हणून गणपतीची पूजा करायची नाही का?'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात अशा काही सेलिब्रेटी आहेत ज्या त्यांच्या बिनधास्तपणामुळे कायम चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. त्यात अभिनेत्री अर्शी खानच्या (arshi khan) नावाचा उल्लेख करावा लागेल. बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना करतात. त्यात काही इतर धर्मिय कलावंतही आहेत. मात्र आता एका अभिनेत्रीला तिच्या धर्मावरुन ट्रोल करण्यात आले आहे. तिनं गणरायाची पूजा केली म्हणून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. त्या अभिनेत्रीचं नाव अर्शी खान असं आहे. आपल्याला ज्या विषयावरुन ट्रोल करण्यात आलं, त्यावरुन तिनं चाहत्यांना चांगलचं सुनावलं आहे. बिग बॉसमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या अर्शीनं त्या रियॅलिटी शो च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले होते.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या अर्शीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिला गणरायाची पूजा केली म्हणून ट्रोल करण्यात आले आहे. तिनं गणरायाची पूजा कऱणं हे काहींना खटकलं आहे. त्यावरुन तिच्यावर अशोभनीय शब्दांत टीकाही करण्यात आली आहे. मात्र त्या टीकेला अर्शीनं जशास तसे उत्तरही दिलं आहे. गणपतीची पूजा करणे त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ तिनं शेयर केला आहे. अर्शीचं म्हणणं आहे की, मला मुस्लिम होण्याचा गर्व आहे. याबरोबरच मी भारतीय असल्यानं प्रत्येक सण साजरे करणार. अर्शीनं जो एक व्हिडिओ शेयर केला आहे त्यात ती आसामी लूक करुन गणपतीची पूजा करण्यासाठी गेली होती. ती म्हणते असा विचार केला की, तो पूजा करतानाचा फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करावा. त्यानुसार तिनं तो फोटो शेयर केला. जेव्हा मी त्या फोटोवरील अनेकांच्या कमेंट पाहिल्या तेव्हा मला वाईट वाटले. हा काय प्रकार आहे हे काही लक्षात येईना. मला ज्यांनी शिव्या दिल्या आहेत त्यांना मी उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नव्हते.

मला काही मुस्लिम व्यक्तींनी देखील शिव्या दिल्या आहेत. दोन्ही धर्माच्या काही व्यक्ती मला दोष देत आहे. आपल्या एका व्हिडिओमध्ये अर्शी म्हणते, एक भारतीय नागरिक असल्याच्या अधिकारात मला वाटतं तो सण मी साजरा करु शकते. मग ती ईद असो किंवा दिवाळी. ज्यातून मला सर्वाधिक आनंद मिळणार आहे ती गोष्ट आपण का करु नये, हा माझा प्रश्न आहे. कृपया मला काय करावं हे सुचवू नका. मी मुस्लिम आहे, याचा मला गर्वही आहे. पण मी सगळे सण साजरे करणारच. या शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना तिनं गणेश चतुर्थीच्या आपल्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा: Ganesh Festival 2021 : बॉलीवूड सेलिब्रिटींचा बाप्पा; पाहा फोटो

हेही वाचा: 'इंडियन आयडॉल' शो च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

loading image
go to top