
'इंडियन आयडॉल' शो च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
मुंबई : इंडियन आयडॉल शोच्या (indian idol) मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना 'इंडियन आयडॉल हा शो आता मायबोली मराठीतही लवकरच पाहायला मिळणार आहे. हो हे खरं आहे. कोण होणार करोडपती नंतर आता सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच 'इंडियन आयडॉल - मराठी' (indian idol-marathi) घेऊन येत आहे. त्यामुळे शो च्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 'सोनी मराठी' ने आपल्या सोशल मिडीयावर त्याचा एक प्रोमो लॉंच केला आहे. त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता.
स्पर्धकांना मिळणार हक्काचा मंच
इंडियन आयडॉल'ची आत्तापर्यंत अनेक सीझन झाली आहेत, ज्याला नेहमीच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आणि त्या कार्यक्रमाला टीआरपी देखील मोठ्या प्रमाणात मिळते. तसेच त्यातून देशाला अनेक कलाकारही मिळाले आहेत. आता 'इंडियन आयडॉल - मराठी' या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे..प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सोनी मराठी वाहिनी नेहमीच आघाडीवर राहिली आहे.