
मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali ) हे त्यांच्या हटकेपणासाठी प्रख्यात आहेत. अवाढव्य सेट, त्यातील कल्पकता, त्याची मांडणी आमि सादरीकरण यामुळे भन्साळींचे चित्रपट हे नेहमीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असतात. त्यांचे काही कलाकारही ठरलेले आहेत. त्यांना सोडून ते सहसा चित्रपट करत नाहीत. प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण (actress deepika padukone ) ही त्यापैकी एक. तिनं त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बाजीराव मस्तानीमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता भन्साळींच्या नव्या चित्रपटात तिचा वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (actress deepika padukone will work with sanjay leela bhansali next film baiju bawra)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी हे त्यांच्या आगामी बैजू बावरा चित्रपटासाठी दीपिकाला (Deepika padukone ) साईन करणार आहेत. त्यात ती मुख्य भूमिका करणार असून दीपिकाला त्यात डाकू रुपमतीची भूमिका मिळणार असल्याची माहिती आहे. भन्साळी यांनी तिला ती भूमिका द्यायची आहे. भन्साळी आणि दीपिकाच्या बाँडिंगविषयी सर्वांना माहिती आहे. यापूर्वी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दीपिकानं महत्वाची भूमिका साकारली आहे. महाराणीच्या भूमिकेनंतर प्रथमच ती एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे.
रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत (ramleela, bajirao mastani, padmavat) सारख्या चित्रपटांमध्ये तिनं महत्वाची भूमिका साकारली होती. पिंकविलानं दिलेल्या रिपोर्टनुसार भन्साळींच्या बैजू बावरा चित्रपटात दीपिका ही लीड रोलमध्ये असणार आहे. ती रुपमतीची भूमिका साकारणार आहे. मात्र याबाबत संजय भन्साळी यांच्याकडून अद्याप कुठलेही कन्फर्मेशन आलेले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भन्साळी आणि दीपिका यांची मिटिंग झाली आहे.
काही दिवसांपूर्वी अशा बातम्या पसरल्या होत्या की, दीपिका आणि भन्साळी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. भन्साळी हे त्यांच्या गंगूबाई काठियावाडीच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहेत. त्या चित्रपटामध्ये दीपिकानं आयटम साँग केले आहे. त्याचबरोबर भन्साळी यांनी तिला त्यांच्या हिरा मंडी नावाच्या वेबसीरिजसाठीही ऑफर दिली होती. दीपिकानं ती रिजेक्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.