'बिग बॉस' फेम अभिनेत्री देवोलिनाने लॉकडाऊनमध्ये केलं असं काही काम जे पाहुन चाहत्यांनाही वाटला अभिमान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

सगळे सेलिब्रिटी आपापल्या परिने मदत करत असताना अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी वेगळ्या पद्धतीने मदत करत पुढे आली आहे.

मुंबई- कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या कठीण परिस्थितीशी लढण्यासाठी अनेक कलाकार मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. एकूणच सरकारला मदत करण्यासाठी सर्वच जण आपापल्या परिने मदतीचा हात पुढे करत आहेत. यासाठी अनेक नामवंत चेहरे पुढे आले. यामध्ये कोणी आर्थिक मदत करतयं तर कोणी अन्न-धान्य आणि खाद्य पदार्थांची मदत करत आहेत. याशिवाय काही आपले हॉटेल्स किंवा ऑफिसेस डॉक्सर्स, नर्सेस, आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून दिले गेले आहेत.. सगळे आपापल्या परिने मदत करत असताना अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी वेगळ्या पद्धतीने मदत करत पुढे आली आहे.

coronavirus: अभिनेता संजय दत्तही एक हजार गरजु कुटूंबाना पुरवणार जेवण

'बिग बॉस 13' फेम देवोलीना भट्टाचार्जीने अशी मदत केली आहे की तिच्या चाहत्यांना तिने केलेल्या या मदतीसाठी अभिमान वाटत आहे. नुकतेच तिने आसाममधील दोन कुटुंबांना एका महिन्यासाठी दत्तक घेतले आहे. याशिवाय तिने या दोन कुटुंबांना महिनाभरासाठी लागणारं अन्न-धान्य आणि इतर गरजेच्या वस्तुंसाठी पैश्यांची देखील मदत केली आहे..याची माहिती तिची एक चाहती वीरा कुनापारेड्डी हिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले आहे की, देवोलिना तुम्ही दोन कुटुंब महिन्याभरासाठी दत्तक घेतल्याबद्दल आणि त्या कुटुंबांना अन्न-धान्य आणि गरजेच्या वस्तूंसाठी पैश्यांची मदत केल्य़ाबद्दल तुमचे खूप आभार. आणि आसाममधील चाहत्यांसाठी हे बिहूनिमित्ताने बेस्ट गिफ्ट मिळालं आहे.'

वीराची ही पोस्ट देवोलिनानेही नंतर शेअर केलेली पाहायला मिळतेय..

वीरा ही देवोलिनाच्या 'हेल्पिंग हॅण्ड' या संस्थेसाठी काम करते आहे. या संस्थेतून देवोलिना गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असते. याआधी ही देवोलीनाने एका गर्भवती महिलेची मदत केली होती. देवोलीनाने केलेल्या या मदतीसाठी तिच्या चाहत्यांकडून तिचं खूप कौतुक केलं जात आहे.

actress devoleena bhattacharjee adopts two families in assam and donates money for their ration and food amid lockdown  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress devoleena bhattacharjee adopts two families in assam and donates money for their ration and food amid lockdown