
कमी वयात वाट्याला आलेली प्रसिध्दी यामुळे जास्त वाहवत न जाता रोखठोकपणे भूमिका मांडणारी अभिनेत्री म्हणूनही फातिमाचा उल्लेख करावा लागेल.
मुंबई - कलावंत म्हटला की तो थोडासा लहरी आलाच. त्याचे वेगवेगळे मुडस्विंग पाहून अनेकदा त्याचे चाहतेही बुचकाळ्यात पडतात. प्रत्येक कलाकार त्य़ाची विचारधारा वेगळी असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दंगल गर्ल फातिमा सनानं जे वक्तव्य केलं आहे त्यावरुन ती वादाच्या भोव-यातही सापडली आहे.
फातिमा आज आपला जन्मदिवस साजरा करत आहे. दंगल चित्रपटामुळे प्रसिध्दीस आलेल्या फातिमाला त्यानंतर अनेक चित्रपट मिळाले. एक अभिनेत्री म्हणून आपला वेगळा ठसा उमटविण्यात ती यशस्वी झाली आहे. 11 जानेवारीला हैद्राबाद याठिकाणी जन्म झालेल्या फातिमाची ओळख दंगल गर्ल मधून ठळकपणे जाणवली. कमी वयात वाट्याला आलेली प्रसिध्दी यामुळे जास्त वाहवत न जाता रोखठोकपणे भूमिका मांडणारी अभिनेत्री म्हणूनही फातिमाचा उल्लेख करावा लागेल. तुम्हाला माहिती नसेल फातिमा ही चाची 420, वन टू का फोर. दिलवाले सारख्या चित्रपटांत बालकलाकार म्हणून दिसली आहे.
एका मुलाखती दरम्यान फातिमानं लग्नाविषयी आपले परखड विचार व्यक्त केले होते. ती म्हणाली होती की मला कधीही लग्न करायचे नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं असे सांगितले होते, अजून लग्न करण्याचा माझा काहीही विचार नाहीये. अजून मी लहान आहे. मला सुखानं जगु द्या. जेव्हा तिला लग्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा मात्र तिनं स्पष्टपणे कधीही करणार नाही. त्यावर माझा विश्वासच नाही. मला त्याबाबत असे वाटते, ज्यावेळी तुम्हाला कोणाबरोबर राहावेसे वाटते तेव्हा तुम्हाला लग्नासाठी कुठल्या एका कागदपत्राची गरज नाही.
हे ही वाचा: दीपिका-हृतिकची जोडी पडद्यावर झळकणार, आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज
लग्नं केले म्हणजे तुमच्या त्या व्यक्तीवर प्रेम असतेच असे नाही. मी थोड्या मोकळ्या विचारांची आहे. फातिमानं दंगल नंतर आमीरच्या ठग्स ऑफ हिंदुस्थानमध्येही काम केले होते. बिग स्टार असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यानंतर मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये आलेल्या लूडो आणि सूरज पे मंगल भारी या चित्रपटातही दिसली होती.