
हृतिकने वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. त्याने सोशल मिडियावरुन त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करत त्याचं मोशन पोस्टर देखील शेअर केलं आहे.
मुंबई- हृतिक रोशन, दीपिका पदूकोण आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अखेर सगळ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेता हृतिक रोशनने नुकताच १० जानेवारी रोजी त्याच्या ४७ वा बर्थ डे सेलिब्रेट केला. हृतिकने वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. त्याने सोशल मिडियावरुन त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करत त्याचं मोशन पोस्टर देखील शेअर केलं आहे.
हे ही वाचा: ४७ वर्षांचा झाला हृतिक रोशन, फिट राहण्यासाठी असं करतो डाएट..
अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोण 'धूम ४' किंवा इतर कोणत्याही सिनेमात एकत्र दिसून येणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस होत होती. आता हृतिकने त्याच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्याचा आगामी सिनेमा 'फायटर'ची घोषणा केली आहे. सोबतंच सिद्धार्थ आनंद प्रोडक्शन हाऊस marflix आणि दीपिका पदूकोण यांना सादर करत एक छोटीशी नोट लिहिली आहे.
हृतिकने 'फायटर' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत लिहिलंय, ''marflix विजनच्या फायटरची झलक सादर करत आहे. दीपिका पदूकोणसोबत हा माझा पहिला सिनेमा असेल. मी या सुंदर प्रवासासाठी पूर्णपणे तयार आहे सिद्धार्थ आनंद.'' तुम्हाला या मोशन पोस्टरमध्ये हृतिकचा आवाज ऐकायला मिळेल. तो सांगतो की 'दुनिया में मिल जाए आशिक कई, पर वतन से हसीन सनम नहीं होता. हिरों मे सिमट कर, सोने से लिपट कर मरते है कई, पर तिरंगेसे खुबसुरत कफन नहीं होता.'
Presenting a glimpse of the MARFLIX vision as #Fighter! Looking forward to my first flight alongside the exceptional @deepikapadukone. All buckled up for this #SiddharthAnand joyride. pic.twitter.com/gaqv53xbO9
— Hrithik Roshan (@iHrithik) January 10, 2021
सिद्धार्थ आनंदने त्याच्या या स्टायलिश ऍक्शन सिनेमामध्ये बॉलीवूडचे हुशार आणि टॉप लिस्टेड सेलिब्रिटीला कास्ट केलं आहे ते म्हणजे हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोण. दीापिका सध्या अनेक सिनेमे साईन करत आहे आणि आता पुन्हा एकदा एक मोठा सिनेमा तिच्या यादीच सामिल झाला आहे. दीपिकाने 'फायटर'चं मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं आहे 'स्वप्न खरंच सत्यात उतरतात.'
तेव्हा आता या सिनेमामध्ये हृतिक आणि दीपिकाची भूमिका काय असेल? सिनेमाची कथा देशभक्तीवर आधारित असल्याचं मोशन पोस्टर मधून वाटत असल्याने नक्कीच ही जोडी कमाल करेल अशी चर्चा सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.
hrithik roshan deepika padukone come together for siddharth anands fighter see motion poster