flora saini, raj kundra
flora saini, raj kundrafile image

"राज कुंद्रा प्रकरणात विनाकारण माझं नाव गोवलं गेलंय"

'गंदी बात' फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीचं स्पष्टीकरण
Published on

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj kundra) अश्लिल चित्रफितनिर्मिती प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राज कुंद्रा हा या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री फ्लोरा सैनीचे (flora saini) नाव राज आणि त्याचा असिस्टंट उमेश कामत यांच्या व्हॉट्स अप चॅटमधून समोर आले होते. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये फ्लोराने स्पष्टीकरण दिले आहे. (actress flora saini says she never talk with raj kundra)

'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये फ्लोराने सांगितले, 'माझं राज कुंद्रासोबत कधीच बोलणं झालं नाही. मला या गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे. कारण जर मी गप्प बसले तर लोक असं गृहित धरतील की, मी काही तरी लपवत आहे. जर दोन व्यक्ती त्यांच्या व्हॉट्स-अप चॅटमध्ये माझं नाव घेत असतील तर त्याचा अर्थ असा नाही की मला त्यांच्यामध्ये सुरू असलेले बोलणे माहित असेल किंवा मी त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी असेन. माझ्या व्यतिरिक्त अनेकांची नावं त्यांनी घेतली असणार, कदाचित अशा अभिनेत्रींची ज्यांनी बोल्ड सिन केले आहेत. पण मी फिल्म इंडस्ट्रीमधील नाही म्हणून त्यांना माझं नाव घेणे सोपे आहे. अश्लिल चित्रपटांच्या स्कँडलमध्ये एखाद्या महिलेचे नाव ओढण्याचे गांभीर्य लोकांना समजत नाही का?'

flora saini, raj kundra
'अशी कामं करायची गरज काय होती?'; चौकशीदरम्यान राजवर ओरडली शिल्पा
flora saini, raj kundra
पूनम पांडे, शर्लिन चोप्रा दोघींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

पुढे तिने सांगितले, 'ही मुलगी असलीच काम करते, असं इतरांनी म्हणणे चुकिचे आहे. हे प्रकरण अश्लिल चित्रपटांसंदर्भात आहे. मला अशा प्रकारची प्रसिद्धी नकोय.' फ्लोराने 'पौरशपुर', 'आर्या', 'इनसाइड एज' या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

flora saini, raj kundra
शर्लिन चोप्रा म्हणते, "चौकशीला जाण्याआधीच मी 'ही' गोष्ट करणार"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com