
- राज कुंद्रा प्रकरणात शर्लिनला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय
मुंबई: अश्लील व्हिडीओ आणि वेब सिरीज बनवल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra Case) याला अटक करण्यात आली. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून या प्रकरणात अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले तसेच काहींवर गंभीर आरोपही करण्यात आले. एकेकाळी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री असणारी आणि नंतर अडल्ट व्हिडीओ तयार करणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिनेदेखील राज कुंद्रावर आरोप केले होते. राजने त्याच्या व्हिडिओमध्ये (Pornography) काम करण्यासाठी आपल्याला विचारणा केल्याचे तिने म्हटले होते. त्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने तिला आज चौकशीसाठी बोलावले आहे. पण चौकशीला जाण्याआधी शर्लिनची अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू असल्याचं कळतंय. (Raj Kundra Case Sherlyn Chopra to move Bombay High Court for anticipatory bail Before appearing at Crime Branch)
राज कुंद्रा प्रकरणात गुन्हे शाखा शर्लिन चोप्राची चौकशी करणार आहे. तिला समन्स पाठवण्यात आले आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर तिने ट्विटरवर व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावेळी तिने यापूर्वी महाराष्ट्र सायबर विभागाने केलेल्या चौकशीत याबाबतची माहिती दिली होती, असा दावा तिने केला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लीलतेप्रकरणी दाखल गुन्ह्यात मार्च महिन्यात महाराष्ट सायबर विभागाने शर्लिनचा जबाब नोंदवला होता.
राज कुंद्राने आपल्याला त्याच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. पण राजला नकार कळवला असता त्याने माझे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती, असं शर्लिनने यापूर्वी सांगितले. त्यानंतर अभिनेत्री पुनम पांडेनेदेखील राज कुंद्राच्या विरोधात एक पोस्ट शेअर केली. त्यात राजनं आपल्याला त्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. ते कॉन्ट्रक्ट साईन न केल्यास नावाबरोबर मेसेज व्हायरल करण्यात येईल, अशी धमकीही राजने दिली होती, असा आरोप पूनम पांडेने केला होता. त्यामुळे आता दिवसेंदिवस राज कुंद्राचा पाय आणखी खोल जात असल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.