
अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला फेब्रुवारी महिन्यात अटक झाली होती. मात्र ही अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी १५ लाख रुपये लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप गहनाने केला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये गहनाला अटक झाली होती आणि जवळपास चार महिने ती तुरुंगात होती. याच प्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. गहनाने व्हॉट्सअॅप चॅटचा उल्लेख करत यश ठाकूर ऊर्फ अरविंद श्रीवास्तव आणि तनवीर हाश्मी या दोघांचं नाव घेतलं. पोलिसांनी लाच मागितल्याने ही दोघं मिळून आठ लाख रुपयांची तरतूद करत असल्याचं चॅटमधून स्पष्ट होत आहे, असं ती म्हणाली. 'इंडिया टुडे'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Actress Gehana Vasisth claims Mumbai Police demanded Rs 15 lakh to avoid her arrest slv92)
४ फेब्रुवारी २०२० रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे मालमत्ता कक्षाने छापा टाकला, तेव्हा अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेब साइटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे.
गहनाविरोधात नवीन गुन्हा
एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मालवणी पोलीस ठाण्यात उद्योजक राज कुंद्राच्या कंपनीतील तीन निर्माते आणि अभिनेत्री गहना वशिष्ठविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 'हॉटशॉट्स' या अॅपसाठी बळजबरीने पॉर्न व्हिडीओ शूट करून घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गहनाने ट्विट करत संताप व्यक्त केला होता. 'थोडीतरी लाज बाळगा आणि देवाला घाबरा', असं तिने ट्विटमध्ये म्हटलं होतं.
राज कुंद्रा प्रकरणात गहना वशिष्ठची काय भूमिका?
राज कुंद्राला ज्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली, त्याचा तपास या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु आहे. यामध्ये मॉडेल व अभिनेत्री गहना वशिष्ठसह नऊ जणांना अटक करण्यात आली. युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरीनचा सहभाग समोर आल्यानंतर राज कुंद्राचे नाव समोर आले. पोलिसांनी अधिकारी उमेश कामतला अटक केली. तो आधी राज कुंद्राकडे काम करायचा. गहना वशिष्ठने शूट केलेले आठ अश्लील पॉर्नोग्राफीक व्हिडिओ सोशल मीडिया अॅपवर अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केनरीनमध्ये राज कुंद्रा भागीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.