gehana vasisth
gehana vasisth

आरोप, अटक, जामिन.. गहना वशिष्ठचा व्हिडीओ व्हायरल

जामिनानंतर सध्या काय परिस्थिती आहे, याविषयी तिने व्हिडीओत सांगितलं.

४ फेब्रुवारी २०२० रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे मालमत्ता कक्षाने छापा टाकला, तेव्हा अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेब साइटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गहनाला जामिन कसा मिळाला आणि आता तिची काय परिस्थिती आहे, याविषयी तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला.

व्हिडीओमध्ये काय म्हणाली गहना?

'माझ्यावर पॉर्नोग्राफी आणि सामूहिक बलात्कार हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पहिल्या प्रकरणाची चार्जशीट ६० दिवसांत आली होती, त्यानंतर मी जामिनासाठी अर्ज केला. चार्जशीट दाखल झाल्यानंतर १०-१२ दिवसांत मला जामिन मिळाला. दुसरा सामूहिक बलात्काराचा आरोप खूप मोठा होता. पण माझ्याविरोधा पुरावे नसल्याने मला जामिन मिळेल असा विचार मी केला होता. पण मी चुकीची ठरले. पुराव्यांशिवाय माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आणि याप्रकरणात तीन महिन्यांत चार्जशीट आली. त्यानंतर मी जामिनासाठी अर्ज केला. त्यावेळी कोर्ट बंद होते. अंतरिम जामिनासाठी अर्ज केला तेव्हा मला कोविडची लागण झाली होती. १७ दिवस मी कोविड सेंटरमध्ये होते. त्यानंतर आरोग्याच्या समस्यांमुळे मला जे.जे. रुग्णालयात दाखल केलं गेलं. अंतरिम जामिनासाठी दाखल केलेले माझे दोन्ही अर्ज फेटाळेले गेले. त्यात ८ मे पासून ६ जूनपर्यंत कोर्ट बंद होते. नंतर मला दोन अटींवर जामिन मिळाला. मी भारताबाहेर जाऊ शकत नाही आणि पॉर्नोग्राफिक शूट करताना मला पकडलं तर जामिन रद्द केला जाईल. पण मी लोकांना हे सांगू इच्छिते की मी याआधीसुद्धा अश्लील चित्रफितींसाठी काम केलं नाही. आता मी माझे मोबाईल, लॅपटॉप परत मिळवण्यासाठी आणि गोठवलेली बँक खाती मोकळी करण्यासाठी लढतेय. कारण मी लोकांकडून पैसे उधार मागून जगतेय. माझ्या सगळ्या बँक खात्यांमधील रक्कम गोठवण्यात आली आहे. जामिनावर सुटल्यानंतर मला हृदयविकाराचा झटका आला आणि मी पुन्हा काही दिवस रुग्णालयात दाखल होती. माझ्या घरावरही अज्ञात लोकांनी ताबा मिळवला असून पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यासाठी माझी धडपड सुरू आहे', असं तिने या व्हिडीओत म्हटलंय.

gehana vasisth
Raj Kundra case: व्हायरल मीम्सवर गहना वशिष्ठ म्हणते, 'प्रत्येकजण फायदा घेतोय'

राज कुंद्रा प्रकरणात गहना वशिष्ठची काय भूमिका?

राज कुंद्राला ज्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली, त्याचा तपास या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु आहे. यामध्ये मॉडेल व अभिनेत्री गहना वशिष्ठसह नऊ जणांना अटक करण्यात आली. युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरीनचा सहभाग समोर आल्यानंतर राज कुंद्राचे नाव समोर आले. पोलिसांनी अधिकारी उमेश कामतला अटक केली. तो आधी राज कुंद्राकडे काम करायचा. गहना वशिष्ठने शूट केलेले आठ अश्लील पॉर्नोग्राफीक व्हिडिओ सोशल मीडिया अ‍ॅपवर अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केनरीनमध्ये राज कुंद्रा भागीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com