wedding Anniversary:'तुमच्या शुभेच्छांमुळे लग्नाच्या वाढदिवशी धर्मेंद्र घरी आले..' हेमा मालिनी भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'तुमच्या शुभेच्छांमुळे लग्नाच्या वाढदिवशी धर्मेंद्र घरी आले..' हेमा मालिनी भावूक

'तुमच्या शुभेच्छांमुळे लग्नाच्या वाढदिवशी धर्मेंद्र घरी आले..' हेमा मालिनी भावूक

शोले मधील 'बसंती' आणि शोले च्या दमदार भूमिकेतून आजही प्रेक्षकांच्या आठवणीचा भाग असलेल्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या बॉलीवूडमधील खास जोडप्याचा आज लग्नाचा वाढदिवस. या शुभ दिवशीच आजारी असलेले धर्मेंद्र देवाच्या आणि चाहत्यांच्या कृपेने रूग्णालयातून घरी परतल्याची माहिती पुढे येते आहे.अनेक दिवसांपासून धर्मेंद्र स्नायूंच्या दुखण्याच्या त्रासाने त्रस्त होते.आज ते घरी आले असून त्यांच्या प्रकृतीतील सुधार बघून हेमा मालिनी भाऊक झाली.आनंद आणि अश्रू या दोन्ही गोष्टींचा वर्षाव झाला.त्याला कारणही तसेच होते.

८६ वर्षीय धर्मेंद्र जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा हजारो चाहत्यांनी त्यांच्या राहत्या घरी त्यांना पत्र पाठवून बळ दिले. (Movies)तर अनेकांनी त्यांची फोन करून विचारपूस केली.नेमका आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला बघून हेमा मालिनीबरोबरच चाहतेही भाऊक झाले.लग्नाच्या वाढदिवशी आपला जोडीदार रूग्णालयातून घरी परत यावा यापेक्षा आनंददायी क्षण कुठला असू शकतो.हा आनंद हेमा मालिनीने तीच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करत सगळ्या चाहत्या वर्गाचे आभार मानले आहेत.

धर्मेंद्र यांनीही त्यांच्या प्रकृतीचा अपडेट देत त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.ते बरे झालेत हे बघून चाहत्यांना देखिल आनंद झालाय.चाहत्यांनी यावेळी त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'कुठल्या गोष्टींना मर्यादा असू द्या.त्याचा अतिरेक करू नका.मी केला आणि त्याचे परिणामही भोगलेत', असे कॅप्शन त्यांनी पोस्टसाठी दिले आहे.हेमा मालिनीने देखिल धर्मेंद्र सोबतचा एक फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवशी सगळ्यांचे आभार मानले आहेत.'आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.धर्मेंद्रची अशीच साथ कायम असो', अशा भावना हेमा मालिनीने ट्वीटरवर व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Actress Hema Malini Shared A Post On Her Wedding Anniversary She Thank To Gad And Fans For Praying Dharmedras

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top