'मी ट्रोलर्सला घाबरत नाही, करियर संपण्याची भीती मला नाही..' हेमांगी कवी..

अभिनेत्री हेमंगी कवीचे ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर, आज जरा स्पष्टच बोलली.
actress hemangi kavi answered to trollers
actress hemangi kavi answered to trollers sakal

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. शिवाय समाज माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. पण बऱ्याचदा तिला खूप ट्रॉल केले जाते. वाटेल त्या भाषेत टीका केली जाते. याकडे ती कशी बघते, यावर हेमांगीने सडेतोड उत्तर दिले आहे. (actress hemangi kavi answered to trollers she said I never fear to troll)

नुकतंच हेमांगीने एका मुलाखतीत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणते, 'लोकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगच मी सुरुवातीला फार विचार करायचे. पण आता मी त्याला महत्त्व देत नाही. ट्रोल करणाऱ्या लोकांपासून पळ काढून मी माझं अकाऊंट कधीही बंद केलं नाही किंवा त्यांच्या कमेंट डिलीटस् केल्या नाहीत. त्याउलट माझ्या पोस्ट ट्रोलर्समुळेच चर्चेत आल्या. या निमित्ताने अनेक तरुण मुलं-मुली माझ्याशी जोडले गेले आणि त्यांनी याबद्दल माझ्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यामुळे मी ट्रोलर्सनेच मला मोठं केलं असं मी मानते आणि त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानते,' असेही ती म्हणाली.

'ट्रॉलर्सच्या टीकेमुळे माझं करिअर संपेल याचा मी कधीही विचार करत नाही. किंवा मला कुणी काम देणार नाही, याचीही मला भीती वाटत नाही. मी कधी स्वतःची तुलना कुणासोबत केली नाही. मुळात मी कुठल्या स्पर्धेत उतरलेच नव्हते, आजवर जे काम मिळालं, त्या कामात १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला. मी अगदी १५ सेकंदाचं रीलही मी मनापासून करते', असेही ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली, 'मी कलाकार आहेच पण या देशाची नागरिक आधी आहे. त्यामुळे मी कर भरते, मतदान करते आणि मलाही बोलण्याचा अधिकार आहे. आपत्ती आल्या की कलाकारांनी मदत करण्याची अपेक्षा केली जाते. त्यावेळी त्यांची सामाजिक बांधिलकी काढली जाते. मग इतरवेळीही आम्ही जागं असणं गरजेचं आहे ना? मी आधी माणूस मग कलाकार आहे, त्यामुळे व्यक्त होणं हा माझा अधिकार आहे. '

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com