बाबो! एवढा महाग चहा.. हेमांगीने सांगितला 'ताज'मधील 'तो' अनुभव..

अभिनेत्री हेमांगी कवीला नवऱ्याने वाढदिवसाच्या निमित्त थेट 'ताज' हॉटेल मध्ये नेले आणि हेमंगीची झोपच उडली.
actress hemangi kavi shared experience in taj hotel mumbai her dream come true
actress hemangi kavi shared experience in taj hotel mumbai her dream come true
Updated on

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला खूप ट्रॉलही केले जाते. पण आज तिने एक वेगळाच अनुभव सांगितला आहे. गेली ४१ वर्ष ती मुंबईतील 'ताज' हॉटेलमध्ये जाण्याचे स्वप्न पाहत होती. अखेरी तिच्या वाढदिवकशी तिच्या नवऱ्याने तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. 'ताज; मध्ये तिचा अनुभव नेमका कसा होता याचं अत्यंत रम्य वर्णन तिने आपल्या पोस्ट मध्ये केले आहे. (actress hemangi kavi shared experience in taj hotel mumbai her dream come true)

काल २६ ऑगस्ट रोजी हेमांगीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने तिच्या नवऱ्याने तिला एक मोठं सरप्राईज दिलं. प्रत्येक मध्यमवर्गी मराठी माणसाचं स्वप्न असलेल्या 'ताज' हॉटेलमध्ये ते तिला घेऊन गेले होते. तो धक्का तिच्यासाठी अत्यंत सुखद होता. पण अशा ठिकाणी गेल्यावर मध्यमवर्गीय माणसाचं नेमकं काय होतं, याचं अचूक आणि भन्नाट वर्णन हेमांगीने केलं आहे.

हेमांगी म्हणते, 'लहानपणापासून वाटायचं 'साला एकदा तरी ताज हॉटेल मध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार! 41 वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेल मध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो typical मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात ac, building ला lift, 24 तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा! ही सगळी साधनं परिस्थिती 'आता सुधारलीये बरं' म्हणायला पुरेशी असली तरी middle class mentality, मध्यम वर्गीय 'मानसिकता' गळून पाडेल याची guarantee देत नाहीत!

'माझं college ऐन मुंबई तलं, Sir J. J. School of fine arts! Gateway of India च्या जवळचं! तिथंच मागे उभं असलेलं आणि लहानपणी कुठेतरी चित्रात black n white मध्ये पाहिलेलं हॉटेल ताज! भव्य दिव्य! बाहेरून building इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! आत सोडलं नाही तर, हाकलून दिलं तर, अपमान केला तर? आणि समजा गेलोच आत तर 250/300 रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या cutting च्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत "ह्या , हे आपलं काम नव्हे" चे घोट प्यायचो!

या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी भटकंती झालीये. भारतात, भारताबाहेर, उंची उंची हॉटेल मध्ये राहायलेय. तिथलं खाल्लय, प्यायलेय. इतक्या वर्षात मोठ्या जागेची, झगमगाटाची, high standard life ची, जगण्याची नाही किमान पाहण्याची तरी सवय आता झालीये खरंतर पण ताज हॉटेल मध्ये जायचा nervousness अजूनही गेला नाही! गेल्या काही वर्षात तर बाहेरदेशात गेलं की तिथल्या खाद्यपदार्थांची किंमत indian rupees मध्ये किती हे न पाहता dollars, euros खर्च केलेत.

नवरा अनेक वेळा म्हणालाय, "अगं जाऊन तर बघू ताज मध्ये" आणि मी म्हणायचे, “नको कशाला? त्या 250 रुपयात तिथल्या पेक्ष्या भारी आणि 100 वेळा चहा बनवून देईन तुला!" Typical middle class! हा confidence 2007 साली पहिल्यांदा जेव्हा त्याने मला pizza खाऊ घातला तेव्हा नव्हता कारण चहा बनवण्यात आणि पिझ्झा बनवण्यात फरक असतो!
तर काल हट्टाने तो मला वाढदिवसानिमित्त हॉटेल ताज मध्ये घेऊन गेला!
४१ वर्षात पहिल्यांदा हॉटेल ताज मध्ये शिरले! बाहेरून complete उंची लोकांचा 'पेहराव' पण मनात... middle class 'इधर ही ठेहेर जाव'!''

Reception counter वर जाऊन मी स्वतःला surrender करत म्हटलं I am visiting this place for the first time. Please guide me. Surrender जरी केलं असलं तरी english मध्ये बोलायचं हे शस्त्र लपवून मी ठेवलं होतं. ती मुलगी छान हसली आणि म्हणाली कुठं जायचंय तुम्हांला? आयला? मराठी! मी म्हटलं, ते sea lounge कुठेय? जिथून gateway दिसतो तिथं! त्यावर ती म्हणाली corridor मधून सरळ गेलं की left side ला पहिल्या मजल्यावर! मी म्हटलं, Thank you! त्यावर ती म्हणाली "Welcome Hemangi"

आईशप्पथ! Confidence वाढला जो corridor मधून चालताना कामी आला.
Sea Lounge ला पोचलो! Sea lounge च्या खिडक्यांमधून दिसणारा अरबी समुद्र आणि left side ला imagine केलेला आणि अनेक लोकांच्या photo त पाहिलेला gateway दिसला! स्वप्नवत! Sea view side table वर बसलो! काय गम्मत! मौजच आली! तेवढ्यात नवऱ्याने direct जेवणाची order दिली! आणि माझे डोळे तिथल्या झुंबरापेक्षा ही मोठे होत शब्दांशिवाय मोठ्याने ओरडले, "जेवण???? चहा साठी आलो ना आपण?" त्यावर नवऱ्याने अजून मोठे डोळे करून गप्प केलं मला! आणि म्हणाला बाहेर बघ मी फोटो काढतो छान!... मग जेवण आलं, जेवलो आणि हजार फोटो काढले! आणि मग चहा!

''Order देताना त्या पदार्थाच्या बाजूची किंमत बघायची नाही अशी ताकीद असताना ही मी चहा ची किंमत पाहण्याची हिंमत केली! 500 रु! 250 ते 500 रुपयांचा प्रवास झप झप त्या menucard वरून धावू लागला! कधी बाहेरून या ताज हॉटेल कडे पाहणारी मी, आज हॉटेलच्या आत बसून बाहेरचं पाहत होते! Surreal! कधी कधी परिस्थिती असून ही स्वतःसाठी राखून ठेवलेल्या इच्छांवर जबाबदारीचा दगड ठेवलेला असतो आपण! त्या इच्छा मरत नसतात, मारायच्या ही नसतात फक्त मध्ये मध्ये तो दगड हलका हलवून त्या त्या इच्छांना मोक्ष द्यायचा असतो! काल अश्याच एका इच्छेला sea lounge च्या त्या खिडकीतून बाहेर आनंदाने उडत जाताना पाहिलं आणि चेहऱ्यावरचे भाव न बदलता smile देत मी waiter ला order दिली…‘एक चहा'..'' असा सुरेख अनुभव हेमांगीने सांगितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com