hemangi kavi: लता मंगेशकर आणि हेमांगी यांच्यात आहे खास नातं! ही पोस्ट वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress hemangi kavi shared post on lata mangeshkar birth anniversary

hemangi kavi: लता मंगेशकर आणि हेमांगी यांच्यात आहे खास नातं! ही पोस्ट वाचाच

lata mangeshkar birth anniversary : हेमांगी कवी (hemangi kavi) हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला खूप ट्रॉल केले जाते. तर कधी तिच्या बेधडकपणामुळे कौतुकाची थापही तिला मिळते. आज हेमांगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खास आहे. आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती, त्या निमित्ताने हेमांगीने तिच्या आणि लता मंगेशकर यांच्यातील एक खास नाते सांगितले आहे. (actress hemangi kavi shared post on lata mangeshkar birth anniversary)

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांची आज जयंती. या निमित्ताने देशभरात नाही तर जगभरात त्यांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मनोरंजन विश्वातूनही अनेकांनी त्यांच्या स्मृती जागवल्या आहेत. अभिनेत्री हेमांगी कवीने देखील एक पोस्ट केली आहे. पण या पोस्ट मध्ये तिने लता दिदींशी असलेले खास नाते सांगितले आहे.

या पोस्ट मध्ये ती म्हणते,

'मला जर कुणी विचारलं दैवी म्हणजे काय तर मी म्हणेन,'हा आवाज’..
जादू म्हणजे काय तर हा आवाज,
निखळ, नितळ, तरल म्हणजे काय तर हा आवाज,
शाश्वत म्हणजे काय तर हा आवाज!
आमचं भाग्य ज्या शतकात हा आवाज जन्माला आला त्याच शतकात, काळात आम्ही जन्माला आलो! धन्य धन्य झालो आम्ही!
आपण लहान माणसं अश्या महान व्यक्तींशी काही न काही साम्य जोडत असतो. आवाजाची साम्यता जोडायला मला १० जन्म घ्यावे लागतील पण तुमचं पहीलं आणि खरं नाव ‘हेमा’ आहे कळल्यावर मला किती किती धन्य वाटलं होतं काय, कसं सांगू?
हेमा/ लता मंगेशकर वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!'' हेमांगीची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.