esakal | अभिनेत्री हिना खानला पितृशोक

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री हिना खानला पितृशोक
अभिनेत्री हिना खानला पितृशोक
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी हिना खान हिला पितृशोक झाला आहे. तिच्या वडिलांना कार्डीअॅक अरेस्ट आल्यानं त्यात त्यांचे निधन झाले आहे. हिना ही तिच्या वडिलांची अतिशय लाडकी होती. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणा-या हिनानं वडिलांविषयीच्या अनेक आठवणी शेअर केल्या होत्या. मोठ्या संघर्षानं टिव्ही क्षेत्रात हिनानं आपलं नाव आणि ओळख तयार केली. दरम्यान तिला तिच्या वडिलांचा मोठा आधार होता. त्यांच्या निधनानं तिच्यावर मोठा आघात झाला आहे.

मंगळवारी मुंबईत आपल्या राहत्या घरी हिनाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी कामानिमित्त काश्मिरला गेलेली हिना मुंबईला परतली आहे. आपल्या प्रत्येक पोस्टमध्ये हिनाचा आणि तिच्या वडिलांचा फोटो यांचा समावेश असायचा. यापूर्वी तिनं काही व्हिडिओ देखील व्हायरल केले होते. त्यामध्ये तिनं वडिलांविषयी एक तक्रारही केली होती की, त्यांनी हिनाकडून क्रेडिट कार्ड घेतले आहेत. जेणेकरुन ती जास्त खर्च करु नये.

एका मुलाखतीमध्ये हिनानं सांगितलं होतं की, केवळ माझ्या वडिलांनाचा मी काय करणार आहे, माझे स्वप्न काय आहे याची माहिती होती. कश्मिरी परिवारात मोठ्या झालेल्या हिनानं अभिनय क्षेत्रात काम करणं तिच्या घरातील इतर कुणालाही माहिती नव्हते. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या हिनानं काही वेबसीरिजमध्येही काम केले होते.