
मुंबई - योगा भारताला मिळालेली अनमोल देणगी आहे. सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या युगात अनेकांना त्याचा विसर पडला. वेळ नाही अशी सबब सांगून अनेकांनी योगा करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काही काळ का होईना योगा करण्यास फारसा उत्साह कोणी दाखवला नाही. मात्र त्यानंतर प्रसिध्द योगाचार्य रामदेव बाबा यांची योगासनांची प्रात्यक्षिके वेगवेगळ्या चॅनेलवरुन सगळीकडे दिसू लागली. हळुहळु लोकं पुन्हा योगाकडे वळायला लागले. दरम्यानच्या काळात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी योगाचे महत्व ओळखून त्याचा वापर करायला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. यात नाव सांगायची झाल्यास अभिनेत्री सनी लिओनी, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, अनुष्का शर्मा, करिना कपूर या अभिनेत्री नियमितपणे योगा करत असल्याचे दिसून आले आहे.
नर्गिस फार्की, लारा दत्ता, दीपिका पादुकोण, बिपाशा बासु, इलियाना डिक्रुझ यांच्या बरोपर आणखी एका अभिनेत्रीचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे जॅकलीन फॅर्नाडिझ. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात तिच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. जॅकलीन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या दिलदार स्वभावासाठीही प्रसिध्द आहे. गेल्या वर्षी दिवाळीत तिनं आपल्या ड्रायव्हरला चारचाकी भेट दिली होती. आपल्या स्वभावानं तिनं मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स जमा केला आहे. आपल्या करिअर बरोबरच तिनं आरोग्याकडेही लक्ष दिलं आहे. त्यासाठी ती अधिक सजग असल्याचे दिसून आले आहे.
मुळची श्रीलंकन असणा-य़ा जॅकलीनंनं अनेक ब्युटी कॉम्पिटिशन जिंकल्या आहेत. बॉलीवूड़मध्ये आल्यानंतर तिला आणखी प्रसिध्दी मिळाली. त्याचा तिनं आपल्या ब्रॅण्डिंगसाठी उपयोग करुन घेतल्याचे दिसुन आले आहे. अल्लादिन या चित्रपटातून तिनं बॉलीवूडमध्ये इंट्री घेतली होती. ती एक उत्कृष्ठ डान्सरही आहे. सध्या ती सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे तिनं व्टिटरवर शेअर केलेला एक फोटो. त्या फोटोमध्ये जॅकलीन कमालीची सुंदर दिसते आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, श्वास आत घ्या, श्वास बाहेर घ्या. लोकांना योगासनाचे महत्व पटवून देत ते करण्यासाठी आवाहन करणा-या सेलिब्रेटींमध्ये जॅकलीनचं नाव घ्यावे लागेल.
बॉलीवूडच्या वेगवेगळ्या स्टार कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली आहे. मिस युनिव्हर्स श्रीलंका होण्याचा मान जॅकलीननं मिळवला. तिचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर एक वेगळा प्रेक्षकवर्ग तिनं निर्माण केला आहे. वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्येही तिचा सहभाग मोठा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.