actress jasmin bhasin
actress jasmin bhasin Team esakal

जस्मिनच्या कपड्यांची अजब स्टाईल, तुम्ही व्हाल अवाक्!

जॅस्मिन बॉयफ्रेंड अली गोनीबरोबर (Ali Gony) दिसते.
Published on

मुंबई - बॉलीवूडमधील अभिनेत्रींची फॅशन एव्हाना सर्वांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करुन चाहत्यांची पसंती मिळवण्यात त्यांची एकमेकांत स्पर्धा असल्याचे दिसून आले आहे. आता सध्या एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ती अभिनेत्री म्हणजे जॅस्मिन भसीन. (actress jasmin bhasin ) तिचा आपल्या लाडक्या कुत्र्यासोबतचा फोटो व्हायरल (photo viral) झाला आहे. त्याला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र काहींनी तिच्या या फोटोला ट्रोलही केले आहे. (actress jasmin bhasin forget wearing pant as she moves out with her new furry puppy)

एवढ्या छोट्या आकाराचे कपडे घालून जॅस्मिन फिरत आहे यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. बिग बॉसच्या 14 (Big Boss season 14) व्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवणारी स्पर्धक म्हणून जॅस्मिनच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तिनं आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तिला काही बिग बॉसच्या स्पर्धेचा विजेता होता आलं नाही. पण तिनं लोकप्रियता मिळवली. जेव्हा तिनं बिग बॉसचं घर सोडलं तेव्हाही तिची चर्चा सोशल मीडियावर होती (new furry puppy)

जॅस्मिन बॉयफ्रेंड अली गोनीबरोबर (Ali Gony) दिसते. ते दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांच्या फॅन्सलाही त्या दोघांचा अंदाज पसंत आहे. यावेळी जॅस्मिन तिच्या पेट अॅनिमलसोबत बाहेर पडली होती. त्यावेळी ती फोटोग्राफरच्या कॅमे-यामध्ये कैद झाली. तिच्याकडे व्हाईट रंगाचा फरी कुत्रा आहे. त्याला घेऊन ती सायंकाळच्या वेळी जुहू परिसरात फिरत होती. त्यावेळी तिनं रेड कलरचा स्वेट शर्ट परिधान केला होता. तिनं जो शॉटर्स परिधान केला होता. तो खूप लहान असल्याचे दिसून आले आहे.

actress jasmin bhasin
कोरोनानं हाल केलेत, जवळ पैसा नाही, प्रसिध्द गायिकेची पोस्ट
actress jasmin bhasin
गणेश आचार्यला 'खिलाडी'चं गिफ्ट, 3600 डान्सरला मदत

त्यामुळे तिला नेटक-यांनी ट्रोल केले आहे. एका युझर्सनं तिला कमेटं केली आहे की, आपण पूर्ण कपडे घातले नाही का, दुस-यानं लिहिलं आहे त्या कदाचित विसरल्या असतील. अशा या प्रकारामुळे जॅस्मिन यापूर्वीही ट्रोल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com