कोरोनानं हाल केलेत, जवळ पैसा नाही, प्रसिध्द गायिकेची पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

singer sona mohapatra

कोरोनानं हाल केलेत, जवळ पैसा नाही, प्रसिध्द गायिकेची पोस्ट

मुंबई - कोरोनानं सर्वांना चिंतेत टाकले आहे. दिवसभरात वाढणारी रुग्णसंख्या, रुग्णांना उपचारासाठी वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतयं. त्यांना आवश्यक अशा सुविधा मिळत नाही. त्यावरुनही गोंधळ सुरु आहे. असे असताना बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी सध्याच्या परिस्थितीवर आपल्या पोस्ट सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. त्यातील काही आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याची आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसिध्द अभिनेता राजेश खट्टर यांच्या पत्नीनं आपल्या मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर प्रसिध्द गायिका सोना मोहापात्रानंही (singer sona mohapatra) आपल्याला आर्थिक तंगी जाणवत असल्याचे सांगितले आहे. (singer sona mohapatra her savings into shut up sona now she facing financial crisis)

कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक बजेट (corona fiancial buget) कोसळले आहे. त्याचा भार आता डोईजड होताना दिसत आहे. बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनाही पैशांची चणचण जाणवत आहे. त्यांनी आपल्या समस्या सोशल मीडियावर व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनानं सर्वांची डोकेदुखी वाढवली आहे. एकीकडे या महामारीमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. रोजगार बुडाला आहे. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही काहींना भेडसावतो आहे. असे असतानाही आता पैशांची तजवीज कशी करायची असा सवाल अनेकांनी केला आहे.

प्रसिध्द गायिका सोना मोहापात्रानं (singer sona mohapatra) आपल्याला जाणवत असलेल्या आर्थिक समस्येबद्दल खुलासा केला आहे. तिनं आपण सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहोत हे लोकांना सांगितले आहे. आपल्याकडील सर्व पैसे हे एका चित्रपटासाठी गेले आहेत. कोरोनामुळे बाकीची कामं बंद झाली आहेत. त्यामुळे आता पैसा शिल्लक नसल्याचे तिनं सांगितलं आहे. सोनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन यासंबंधीची अधिक माहिती शेअर केली आहे.

सोनानं म्हटलं आहे की, समोर जो प्रश्न उभा राहिला आहे त्यापासून पळता येत नाही. यावेळी तिनं आपला स्माईल करतानाचा फोटो शेअर केला आहे. तुम्ही अशा परिस्थितीत हसायचं की रडायचं ठरवावं लागतं. त्यामुळे मी आता स्वताला हसवत आहे. माझा चित्रपट शट अप सोना अजून वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये जातो आहे. त्यात माझे बरेच पैसे अडकले आहेत. कोरोनामुळे आर्थिक तंगीला तोंड द्यावे लागत असल्याची खंत सोनानं यावेळी व्यक्त केलीय.