'माझी सून खूपच प्रेमळ , सर्वांचं ऐकते; सासरेबुवाही तिच्या प्रेमातच' 

actress jaya bachchan revealed when Amitabh bachchan seeing Aishwarya rai first reaction
actress jaya bachchan revealed when Amitabh bachchan seeing Aishwarya rai first reaction
Updated on

मुंबई - विश्वसुंदरी म्हणून ऐश्वर्याला सारं जग ओळखतं. बॉलीवूडमध्येही तिनं आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. केवळ शहेनशहा अमिताभ बच्चन यांची सुन ही तिची ओळख नाही तर आपणही एक गुणवान अभिनेत्री आहोत हे तिनं दाखवून दिलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या कोटीत आहे. सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. सुन म्हणूनही अनेकदा बच्चन कुटूंबीय तिचं गुणगाण गाताना दिसून आले आहेत. ज्यावेळी पहिल्यांदा ऐश्वर्याला अमिताभ यांनी पाहिलं होतं तेव्हा त्यांना आठवण झाली होती एका अभिनेत्रीची. कोणत्या? चला जाणून घेऊया.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी याबाबत एक खुलासा केला होता. अमिताभ हे आपल्या मुलीत आणि सुन यात फरक करत नाही. त्यांना अनेकदा आपल्या सुनेचे कौतूक करताना पाहिले गेले आहे. ऐश्वर्याही आपले सासरे आणि सासू यांचे कौतूक करताना दिसते. ती त्यांचा आदर करते. जया बच्चन यांनी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, ज्यावेळी अमिताभ यांनी ऐश्वर्याला पाहिले तेव्हा त्यांना असे वाटले की, श्वेता पुन्हा घरी आली आहे. तिच्या डोळ्यात त्यांना श्वेता दिसली. ऐश्वर्यानं श्वेताची जागा भरुन काढली. असे म्हणता येईल.

ऐश्वर्या ही खुप गोड आहे. ती सर्वांची काळजी घेते. ती एक मोठी स्टार आहे हे जरी खरे असले तरी सर्वांना प्रचंड मान देते. सर्वांचा आदर करते. आता ती आमच्या सर्वांच्या आयुष्याचा भाग झाली आहे. विशेषत अमिताभ हे जेव्हा ऐश्वर्याला पाहतात तेव्हा त्यांना प्रचंड आनंद होतो. एकदा त्यांनी सांगितले होते की, ऐश्वर्या आल्यानं फार मोठं काही झाले नाही. एका घरातील मुलगी दुस-या घरात गेली. आणि दुस-या घरातील मुलगी आमच्या घरात आली. अमिताभ ऐश्वर्याला आपली सून नव्हे तर मुलगी मानतात.

ऐश्वर्यानं अमिताभ यांच्या बरोबर काही चित्रपट केले आहेत. त्यात बंटी और बबली, खाकी, हम किसीसे कम नही, मोहब्बते, क्यो हो गया ना आणि सरकार राज यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 2000 साली अभिषेक आणि ऐश्वर्याची पहिली भेट झाली होती. ढाई अक्षर प्रेम के च्या सेटवर ती भेट झाली होती. त्यावेळी ऐश्वर्या दुस-या कुणाला डेट करत होती. 2006 ते 07 दरम्यान दोघांमधील मैत्री ही प्रेमात रुपांतरीत झाली. गुरुच्या वेळी त्यांच्यातील जवळीकता आणखी वाढली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com