'सेक्रेड गेम्स'मध्ये कल्की कोचलीनची वर्णी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

कल्की कोचलीनची वेबसिरिजमध्ये काय भूमिका असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 

'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजचा पहिला भाग गाजल्यानंतर दुसऱ्या भाग बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. अशातच 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा भाग येणार असल्याच्या घोषणेबाबत एप्रिल फुल करत प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आणखी ताणल्या गेले आहे. पण ही उत्सुकता अशीच वाढत राहावी याची काळजीही घेतली जात आहे. नुकतंच स्पॉटबॉय रिपोर्टनुसार, 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या भागात अभिनेत्री कल्की कोचलीन हिची वर्णी लागली आहे. 

नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या वेबसिरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने गँगस्टर गणेश गायतोंडे तर सैफ अली खानने पोलिस सरताज सिंगच्या भूमिका साकारली आहे. ही वेबसिरिज विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. कल्की ची वेबसिरिजमध्ये काय भूमिका असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 'सेक्रेड गेम्स 2' जून ते ऑगस्टच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे नवाझुद्दीनने एका मुलाखतीत सांगितले होते. ही एक सस्पेंस थ्रिलर वेबसिरिज आहे. 

गेल्या सिजन मध्ये अभिनेत्री राधिका आपटे आणि कुब्रा सेठ या मुख्य भूमिकेत होत्या. कल्कीचा 'कैंडीफ्लिप' हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर यावर्षी प्रदर्शित झाला होता. 

 

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Bag it#hidesignxkalki @hidesignhq Photo @ishaannair7 HMU @angelinajoseph Styling @who_wore_what_when

A post shared by Kalki (@kalkikanmani) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress kalki koechlin likely join second season of sacred games webseries