esakal | बायडेन चीनचे पाळीव प्राणी, त्यांच्यापुढे हलवतात शेपटी; कंगणाची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

actress Kananga ranaut calls us president joe biden little pet of china then slammed liberals

बॉलीवूडची वाचाळ अभिनेत्री कंगणाला ज्यो यांचा चांगलाच राग आला आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे ज्यो यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे केलेले कौतूक.

बायडेन चीनचे पाळीव प्राणी, त्यांच्यापुढे हलवतात शेपटी; कंगणाची टीका

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलणी केले. त्यावेळी त्यांनी त्यांचे कौतूक केले. ते सोशल मीडियावरुन व्हायरलही झाले होते. ज्यो यांनी यावेळी अमेरिकी नागरिकांना दिली जाणारी सुरक्षा, आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले होते. प्राथमिक दर्जाच्या सुरक्षेबद्दलही त्यांनी सांगितले होते. तेव्हा ज्यो यांनी जिनपिंग यांचे तोंड भरून कौतूक केले होते.

बॉलीवूडची वाचाळ अभिनेत्री कंगणाला ज्यो यांचा चांगलाच राग आला आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे ज्यो यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे केलेले कौतूक. कंगणानं सोशल मीडियावर त्यावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं ज्यो यांच्यावर टीका केली आहे. तिनं कुठलीही भीडभाड न ठेवता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर निशाणा साधला आहे. कंगणाच्या त्या व्टिटला अनेकांनी ट्रोल केले आहे. काहींनी तिला नको त्या गोष्टीत नाक का खुपसते असा प्रश्नही विचारला आहे.

कंगणानं आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, पाहा चीनचे पाळीव प्राणी कशाप्रकारे शेपटी हलवत आहेत ते. त्यांनी आता चांगलीच विनम्रता दाखवली आहे. हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत की चीनचे राजदूत. तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहात हे पाहून मला लाज वाटते. चीन जगातील सर्वात महाशक्तिशाली देश झाला आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही तसे होण्यास प्रोत्साहन दिले आहे. अशा शब्दांत कंगणानं ज्यो यांच्यावर गंभीर स्वरुपाची टीका केली आहे. एवढ्यावरच कंगणा थांबलेली नाही ती म्हणाली, नेता कसा क्रुर आणि मोठ्या आवाजातला असावा.

भारतासारख्या देशानं आपल्या इतिहासापासून काहीही बोध घेतलेला नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या अमेरिकीमध्ये जे काही होत आहे त्यातून आपण काहीही शिकत नाही. त्यातून आम्ही असे शिकतो की, देशातल्या तरुणाईला चीनच्या हवाले कसे करता येईल. 

'मला कुणाचाही फोन नाही, कपिल शो मध्ये काम नाहीच'

तुम्हाला असे वाटेल की, मी आता अमेरिकेच्या राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली आहे मात्र तसे नाही. दरवेळी कंगणा आपल्या अशाप्रकारच्या विधानांमुळे वादाच्या भोव-यात सापडली आहे. त्यावरुन तिला मोठ्या टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. 

 
 

loading image