'मला कुणाचाही फोन नाही, कपिल शो मध्ये काम नाहीच' 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

भारतीय मनोरंजन विश्वात सर्वाधिक पसंदीचा असणारा कार्यक्रम म्हणजे सोनी वाहिनीवरीत द कपिल शर्मा शो. त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.

मुंबई - कोणेएकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र असणा-या त्या दोघांमध्ये कमालीची भांडणे झाली. त्यानंतर त्यापैकी एकानं त्या मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला. गोष्ट आहे कपिल आणि सुनीलच्या द कपिल शो कार्यक्रमाची. एक दोन दिवसांपूर्वी सुनील कपिल शो मध्ये परतणार अशा बातम्या आल्या होत्या बॉलीवूडच्या भाईजाननं त्यांच्यात मध्यस्थी केल्याचे म्हटले जात होते. आता मात्र त्यावर सुनीलनं प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय मनोरंजन विश्वात सर्वाधिक पसंदीचा असणारा कार्यक्रम म्हणजे सोनी वाहिनीवरीत द कपिल शर्मा शो. त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्या कार्यक्रमाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कपिलचा जुना मित्र सुनील ग्रोव्हरनं कपिलच्या कार्यक्रमात काम करण्यास नकार दिला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलनं यामागील कारण सांगितले. तो म्हणाला, मी काही ठिकाणी वाचले की, सलमान खान यांचा मला फोन आला. त्यांनी आमच्यातील भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगायचे झाल्यास मला त्यांचा फोन काही आला नाही. त्यामुळे सुनील कपिलच्या कार्यक्रमात जाणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

सुनीलच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते सुनील या कार्यक्रमात केव्हा परततो याची वाट पाहत आहेत. सुनीलच्या कॉमेडीनं द कपिल शर्मा शो ची उंची आणखी वाढली होती. मुलाखतीत सुनीलनं सांगितले की, मला कुणाचाही फोन आला नाही. काही दिवसांपासून अशी चर्चा होती की मला सलमान यांचा फोन आला आणि त्यांनी आमच्यातील भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे काही झाले नाही.

हेही वाचा : PM मोदी की राहुल गांधी ? पोल घेऊन फसला रणवीर शौरी

हेही वाचा : अभिनेता संदीप नाहरच्या मृत्यूप्रकरणी पत्नी व सासू अडचणीत; गुन्हा दाखल

कपिल शो मध्ये सुनील परतणार असे म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये आनंदाची भावना होती.  कपिल आणि सुनीलमध्ये वादावादी झाली होती. कोणेएकेकाळी ते चांगले मित्र होते. भांडणामुळे ते एकमेकांपासून दूर गेले. त्याचा परिणाम त्या कार्यक्रमावरही झाल्याचे दिसून आले आहे. वास्तविक याप्रकरणात कपिलनं सुनीलची एकदा माफी मागितली आहे. मात्र सुनीलनं त्याला अजूनही माफ केलेलं नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor sunil grover will not comeback in sony tv comedy show the kapil sharma show